Last Updated: Sunday, July 8, 2012, 09:49
www.24taas.com, जिनेव्हा डब्लूएचओच्य़ा नव्या अभ्यासानुसार रोज फळं आणि भाज्या खाण्याच्या सवयीमुळे हृदयरोगाचा धोका २० टक्क्यांनी कमी होतो. रोज जंक फूड खाण्याने मात्र हृदयरोगाने मृत्यू पावणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे.
जगभरात होणारे अधिकतर मृत्यू हे हृदयाच्या विकारामुळेच होतात. या रोगामुळे २००८ या वर्षी १.७३ कोटी लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरातले ३०% मृत्यू हृदयविकारामुळेच झाले होते. तंबाखू आणि दारू यांचं सेवन, वाईट दर्जाचं अन्न, शारीरिक सुस्ती यामुळे हृदयविकार होतात.
डब्लूएचओच्या अभ्यासात असं सांगण्यात आलंय की लोकांची जीवनशैली जर अशीच राहिली, तर २०३० पर्यंत २.३६ कोटी लोकांचा मृत्यू यामुळेच होण्याची शक्यता आहे.
First Published: Sunday, July 8, 2012, 09:49