Last Updated: Thursday, March 29, 2012, 18:59
www.24taas.com, लंडन पॉपकॉर्नमध्ये फळं आणि भाज्यांपेक्षा जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असल्याचं स्क्रँटन युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे. याचा अर्थ पॉपकॉर्नमध्ये फळं आणि भाज्यांपेक्षाही अधिक रोगप्रतिबंधकारक तत्वं असतात. पॉपकॉर्नमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते आणि फॅट्स कमी असतात. त्यामुळे पॉपकॉर्न शरीरासाठी चांगलं असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अँटीऑक्सिडेंटचं जास्त प्रमाण शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं. त्यामुळे कँसर, डिमेंशिया तसंच हृदयविकारासारख्या आजारांपासूनही शरीराचं रक्षण होतं. त्यामुळे मक्याच्या दाण्यांपासून बनलेले हलके-फुलके वाटणारे पॉपकॉर्न म्हणजेच मक्याच्या लाह्या या शरीरासाठी अत्यंत पोषक आहार ठरू शकतं.
पॉपकॉर्नमध्ये पोलिफेनोल्स अँटीऑक्सिडेंट असतं. हे अँटीऑक्सिडेंट शरीरात गेल्यावर पेशींना हानीकारक असणाऱ्या पदार्थांना शरीरात जमा होऊ देत नाही. पॉपकॉर्नच्या एका बाऊलमध्ये ३०० मिलीग्रामपर्यंत पोलिफेनोल्स अँटीऑक्सिडेंट असू शकतं. एवढं अँटीऑक्सिडेंट व्यक्तिच्या पोलिफेनोल्स अँटीऑक्सिडेंटची गरज दररोज १३ टक्क्यांनी भरून काढतं.
First Published: Thursday, March 29, 2012, 18:59