काळजी घ्या... प्रसुतीनंतरची - Marathi News 24taas.com

काळजी घ्या... प्रसुतीनंतरची

झी २४ तास वेब टीम
 
स्त्रीला बाळाला जन्म देणं म्हणजे तिचा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. त्यामुळेच प्रसुतीनंतर प्रत्येक स्त्रीने आपल्या शरीराची काळजी घेणं आवश्यक आहे. कारण की प्रसुतीनंतर लगेचच गर्भाशय आणि आजूबाजूच्या भागामध्ये विषाणूसंसर्ग होऊ शकतो. सामान्यतः अशा जंतुसंसर्गामुळे खालच्या ओटीपोटामध्ये दुखणे, ताप आणि अंगावरून दुर्गंधीयुक्त स्त्राव जाणे. यासारख्या काही समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
 
प्रसुतीनंतर जंतुसंसर्गाची सुरुवात सामान्यतः गर्भाशयामध्ये होते. जर भ्रूण समाविष्ट असणाऱ्या पडद्यामध्ये जंतुसंसर्ग झाल्यास असा संसर्ग होऊ शकतो आणि प्रसूतीवेदनांच्या काळामध्ये तपास कारणीभूत ठरू शकतो. यामध्ये गर्भाशयाचे अस्तर, गर्भाशयाचे स्नायू किंवा गर्भाशयाच्या आजूबाजूचा भाग यांच्या संसर्गाचा समावेश होतो.
 
जंतुसंसर्गाचे निदान मुख्यतः शारीरिक तपासणीच्या निकालांवर आधारीत असते. काहीवेळा जंतुसंसर्गाचे निदान तेव्हा होते जेव्हा स्त्रीला उच्च ताप असतो आणि इतर कोणतेही कारण आढळून येत नाही तेव्हा या संसर्गाचे निदान होते. डॉक्टर लघवीचा नमुना घेतात आणि तो विषाणूंच्या तपासणीसाठी पाठवितात. कधीकधी रक्ताचा नमुना घेण्यात येतो. जर गर्भाशयाला जंतुसंसर्ग झालेला असेल तर स्त्रियांना शिरेतुन (सुई टोचून) प्रतिजैविके दिली जातात जोपर्यंत ४८ तास विनातापाचे जात नाहीत. त्यानंतर बहुतांश स्त्रियांना तोंडावाटे प्रतिजैविके घेण्याची गरज नसते.

First Published: Thursday, November 17, 2011, 16:23


comments powered by Disqus