गर्भवती स्त्रीचे आरोग्य व सौंदर्य - Marathi News 24taas.com

गर्भवती स्त्रीचे आरोग्य व सौंदर्य

गर्भवती स्त्रियांना केवळ आपल्याच आरोग्याची काळजी घ्यायची नसते तर आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाचंही संगोपन करायचं असतं.पण, त्याच बरोबर आजच्या महिलांना आपलं सौंदर्य याकाळातही टिकवायचं असतं. या दोन्हीवर एकच महत्त्वाचा उपाय आहे. या काळात महिलांनी पौष्टिक आणि सकस आहार घ्यावा. भ्रूणाची योग्य आणि व्यवस्थित वाढ होण्यासाठी पौष्टिक आहार आवश्यक आहे.साधारणतः गर्भवती महिलांनी दररोज २६०० कॅलरीयुक्त संतुलीत आहार घ्यायला हवा.
 
दूध हा या प्रक्रियेतील अत्यंत महत्तवाचा घटक आहे. त्याचबरोबर प्रोटीन्स्‌साठी डाळी, कडधान्ये इ. आहारात नियमीतपणे असावीत.आयोडीनचं योग्य प्रमाण दातांच्या विकारांपासून दूर ठेवतं.व्हिटॅमिन्ससाठी ग्रीन सॅलड, पालेभाज्या खाव्यात.
 
मेथी, मटार, सफरचंद, कारले, पुदिना, काजू इ.पदार्थांतून लोह प्राप्त होतं. आपल्या रोजच्या आहारात खूप गोड जास्त नसावं. तेलकट आणि मसालेदार पदार्थ शक्यतो टाळावेत.अशा पदार्थांमुळे अपचन, त्वचारोग होण्याची समस्या असते. पौष्टिक आहाराबरोबरच अधिक प्रमाणात पाणीही प्यायला हवं. त्यामुळे पचन सुलभ होते आणि उत्सर्जनही.यामुळे त्वचा नितळ होते आणि सौंदर्य खुलून येतं.

First Published: Saturday, December 31, 2011, 17:25


comments powered by Disqus