ताणामुळे कमी होते स्मरण शक्ती,the distension can less memory

ताणामुळे कमी होते स्मरण शक्ती

ताणामुळे कमी होते स्मरण शक्ती
www.24taas.com, वृत्तसंस्था, न्यूयॉर्क

विनाकारण असलेल्या ताणापासून दूरच रहा, नाहीतर वेळेच्या आधी स्मरण कमी होण्याची शक्यता आहे. संशोधकांच्या सांगण्यानुसार, ताण निर्माण करणारे हार्मेान्सची पातळी जास्त असते, वृद्धावस्थेत मेंदूत रचनात्मक परिवर्तन आणि स्मरण शक्तिमध्ये अल्पकालीन बदल दिसून येतो.

संशोधकांनी हा प्रयोग उंदीरावर करुन पाहिला, त्यात अल्पकाळीन स्मृतीला मेंदूतील प्रिफ्रन्टल कॉर्टेक्स पेशीची तपासणी करण्यात आली.

प्रयोगाचा निर्देश करताना उंदीरांमध्ये असलेल्या ताणासाठी जबाबदार हार्मोन कॉर्टिकोस्टेरॉन आणि माणसांमध्ये असलेले हार्मोन कॉर्टिसोल हे सारखेच असतात.

संशोधकांच्या अनुसार, ज्या उंदीरांमध्ये कॉर्टिकोस्टोरॉनचे प्रमाण जास्त असते, त्यांच्या प्रिफ्रन्टल कॉर्टेक्स पेशीच्या संयोजन त्या तुलनेने कॉर्टिकोस्टोरॉनचे उंदीरांपेक्षा खूप कमी असते.

स्टेनफोर्ड विश्वविद्यालयाचे प्राध्यापक रॉबर्ट सॅपोस्कीनी सांगितले की, मेंदूतील प्रिफ्रन्टल भागात हे हार्मोन वाढत्या वयासाठी वेगवान उत्पादक म्हणून काम करु शकतात.

सॅपोस्की सध्या या संशोधनाचा हिस्सा नाही आहेत. तसेच संशोधनातील प्राध्यापक रॅडली यांनी सांगितले की, अभ्यासा दरम्यान समजले की, मेंदूमधील या हार्मोनचा प्रभाव जसा पहिला समजला जात होता तसा नसून त्याहून जास्त पडतो.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, June 22, 2014, 16:03


comments powered by Disqus