45 हजार नोकऱ्यांचा पाऊस पडणार ,45,000 will be admitted to job

45 हजार नोकऱ्यांचा पाऊस पडणार

45 हजार नोकऱ्यांचा पाऊस पडणार
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

देशातील पहिला आयटी पार्क आणि सर्वात मोठा पार्क यावर्षी बनण्याची शक्यता आहे. त्यासाठी 45 हजार नोकर भरती करण्यावर लक्ष आहे.

हा पार्क भारताला आयटी पॉवरहाउस बनवण्याचा भाग आहे. यासोबत अन्य पार्कला जोडल्यास 90,000 नोकरीची संधी असल्याचे समजते.

सदयस्थितीत 330 आयटी कंपनीच्या संबंधित उदयोग 45 हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे.

टेक्नोपार्क इमारतीच्या तिसऱ्या टप्प्यात टीसीएस, इन्फोसिस, युएसटी ग्लोबल, टाटा एक्सी, आईबीएस सोबत 45 हजार नोकऱ्याची निर्मिती होणार आहे. तसेच 90000, प्रत्यक्ष आणि 3,50,000 अप्रत्यक्ष नोकऱ्याची निर्मिती होईल.

टेक्नोपार्कला पुढे नेण्यासाठी टीसीएस, इन्फोसिस, युएसटी ग्लोबल, टाटा एक्सी, आईबीएस या कंपन्याचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. तसेच सर्वसामान्य लोकांना ह्या क्षेत्रात उतरवण्याचा प्रयत्न टेक्नोपार्क करणार आहे, टेक्नोपार्कचे सीईओ के.जी.गिरीश बाबू यांनी ही माहिती दिलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 17, 2014, 11:12


comments powered by Disqus