Last Updated: Thursday, January 30, 2014, 11:16
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहावितरणमध्ये सध्या वायरमन लोकांचा फार मोठा तुटवडा असल्याचं सांगण्यात येत आहे. महावितरणमध्ये वायरमन लोकांची जम्बो भरती होणार आहे.
यासाठी आयटीआय उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आणि वायरमनचे प्रशिक्षण घेतलेल्यांना महावितरणमध्ये रोजगाराची संधी लाभणार आहे.
तसेच उपकेंद्र सहाय्यकाचीही दोन पदे भरली जाणार आहेत. ही पदे चालू वर्षात उपलब्ध केली जाणार आहेत. ही पदं नव्याने निर्माण केली जाणार आहेत.
महावितरणने नुकतीच दोन हजार महिलांची वायरमन म्हणून भरती केली, यानंतर दोन हजार ७०० सहाय्यक विद्युत अभियंत्याची भरती सुरू आहे. यात आता उपकेंद्र सहाय्यक या पदाची भरती केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेची नियमानुसार वर्तमानपत्रात जाहिरात दिली जाणार आहे. महिलांना वायरमन म्हणून संधी देणारी महावितरण ही देशातील पहिलीच कंपनी असल्याचं सांगण्यात येत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 30, 2014, 11:16