नोकरीची संधी : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात भरती

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 07:21

ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हादंडाधिकारी यांच्या कार्यालयात लिपिक आणि टंकलेखक 76 जागा आणि निम्नश्रेणी लघुलेखक 9 जागा अशी एकूण 85 पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 मे 2014 आहे.

राज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार

Last Updated: Thursday, May 15, 2014, 08:58

राज्यात सध्या बेरोजगारांसाठी गुडन्यूज आहे. राज्य प्रशासनाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात जवळपास 3500 जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आता तर मंत्रालयातील 448 आणि मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांतील 852 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासंदर्भात राज्य शासनाने मंगळवारी आदेश काढला आहे.

`केडीएमसी`मध्ये नोकरीची संधी

Last Updated: Saturday, March 1, 2014, 15:59

कल्याण डोंबिवली महापालिकेकडून आस्थापनेवरील वैद्यकीय संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेन भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून २१ मार्च १०१४ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.

बँकिंग क्षेत्रात लवकरच २० लाख नोकऱ्या

Last Updated: Monday, February 10, 2014, 16:28

पुढील पाच ते दहा वर्षांत बँकिंग क्षेत्रात वीस लाखांपर्यंत रोजगार निर्माण होऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.

`महावितरण`मध्ये होणार `महाभरती`

Last Updated: Thursday, January 30, 2014, 11:16

महावितरणमध्ये सध्या वायरमन लोकांचा फार मोठा तुटवडा असल्याचं सांगण्यात येत आहे. महावितरणमध्ये वायरमन लोकांची जम्बो भरती होणार आहे.

पश्चिम आणि मध्य रेल्वेत मेगा भरती

Last Updated: Thursday, January 23, 2014, 08:51

रेल्वेमध्ये मेगा भरती होणार आहे. याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. असिस्टंट लोको पायलट आणि टेक्निशियन पदांसाठी ही भरती होत आहे.

महाराष्ट्र राज्यपाल सचिव कार्यालयात नोकरीची संधी

Last Updated: Saturday, January 11, 2014, 21:25

महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या सचिव कार्यालयात ३१ जागा रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०१४ आहे. चला लागा लगेच कामाला.

रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं भयान वास्तव

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 17:19

राज्यातील रोजगार हमी योजनतील भ्रष्टाचाराचं वास्तव भयान आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे या योजनेचं राज्यात तीनतेरा वाजलेत. कामं करूनही मजुरांना घामाचे पैसेच मिळाले नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहे. तर मजुरीचे पैसे न मिळाल्यानं काहींनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय. ठेकेदारांची मनमानी मजुरांच्या जीवावर उठली आहे. यावरचा हा विशेष रिपोर्ट

नवीन वर्षातील गुड न्यूज - सरकारी नोकरीची संधी

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 12:42

महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई कार्यालयातील आणि आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या अधिपत्याखालील मत्स्यव्यवसाय विभागातील सर्व प्रादेशिक व जिल्हा कार्यालयातील एकूण ६२ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्यातील सहा प्रादेशिक विभागीय कार्यालयस्तरावर परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

मुंबई महापालिकेत ३०० नर्सची होणार भरती

Last Updated: Friday, December 27, 2013, 08:18

मुंबई महापालिकेत ३०० नर्सची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. प्रमुख वैद्यकीय अधीक्षक व खातेप्रमुख यांच्या अखत्यारित असलेल्या १६ उपनगरीय रूग्णालयांच्या आस्थापनेवर कंत्राटी परिचारिका या संवर्गातील ३०० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात नोकरीची संधी

Last Updated: Thursday, November 21, 2013, 16:11

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णयानुसार रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी मागासवर्गी आणि खुला प्रवर्गातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवेची घोषित सात पदे असून एकूण १९ पदे भरण्यात येणार आहेत.

भारत प्रतिभूती मुद्रण व मुद्रा निगममध्ये भरती

Last Updated: Thursday, October 31, 2013, 11:42

तुमच्यासाठी नवी रोजगार संधी उपलब्ध झाली आहे. भारत प्रतिभूती मुद्रण व मुद्रा निगममध्ये ऑफिसर टेक्निकल इलेक्टाँनिक्सच्या १६ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

भारत सरकारच्या कामगार विभागामध्ये भरती

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 12:28

भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयातर्फे कामगार विभागमध्ये सात महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी तपासणीस कामगार भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

एसटीत भरणार २००० चालकांची पदे

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 09:36

बेरोजगार तरुणांना खूशखबर आहे. एस.टी.त चालकांची तब्बल दोन हजार पदे भरण्यात येणार असून याबाबतची जाहिरात महिनाभरात निघणार आहे. ही भरती केवळ कोकणसाठी स्वतंत्र असणार आहे. याबाबचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.

आयडीबीआय बँक भरणार २,२०० जागा

Last Updated: Thursday, October 3, 2013, 16:56

बँकिंग क्षेत्रात आता नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. बॅंकेत नव्याने ३० टक्के नोकर भरती होण्याचे संकेत मिळाले आहेत. दरम्यान, आयडीबीआय बँकेत २,२०० जागा भरण्यात येणार आहे.

आयसीआयसीआय बँकेत ६ हजार जागा भरणार

Last Updated: Thursday, October 3, 2013, 16:08

आयसीआयसीआय बँकेने तुमच्यासाठी एक खूश खबर दिली आहे. बँकिंग क्षेत्रात आता नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. आयसीआयसीआय बँकेत ६ हजार जागा भरण्यात येणार आहेत.

बँकिंग क्षेत्रात ३० टक्के नोकऱ्यांमध्ये होणार वाढ

Last Updated: Friday, October 4, 2013, 06:09

तुमच्यासाठी एक खूश खबर आहे. बँकिंग क्षेत्रात आता नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. बॅंकेत नव्याने ३० टक्के नोकर भरती होण्याचे संकेत मिळाले आहेत. अनेक बॅंकांनी आपल्या शाखांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या शाखांमध्ये मोठ्याप्रमाणात मनुष्य बळाची गरज भासणार आहे.

मुंबई महापालिकेत १५ जागांसाठी भरती

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 12:16

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तीनही प्रमुख रूग्णालय आणि उपनगरीय रूग्णालयांच्या आस्थापनेवरील रक्त संक्रमण अधिकारी या संवर्गातील पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या विधानमंडळ सचिवालयात नोकरीची संधी

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 08:13

महाराष्ट्राच्या विधानमंडळ सचिवालयातली `लिपिक- टंकलेख (गट-क) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.

चला, नोकरीची संधी...जलसंपदा विभागात भरती

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 16:10

जलसंपदा विभागाच्या नाशिक प्रादेशिक निवड समितीच्या अधिपत्याखालील असलेल्या आस्थापनेवरील नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक जिल्ह्यातील गट-ड संवर्गातील सर्व जातनिहाय आणि समांतर आरक्षणनिहाय सर्व प्रवर्गातील सरळसेवा भरती आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

नाशिकला मंदीचा फटका, अनेकांवर बेकारीची कुऱ्हाड

Last Updated: Monday, August 12, 2013, 19:31

नाशिकची औद्योगिक वसाहत मंदीच्या फे-यात अडकत चालली आहे. गेल्या वर्षीपेक्षा सरासरी २० ते २५ टक्के उत्पादनात घट झाली आहे. याचा थेट परिणाम कामगारांवर होतोय. हजारो कंत्राटी कामगारांच्या डोक्यावर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची भीती आहे.

सरकारी रोजगार केंद्रांनाच घरघर!

Last Updated: Monday, May 6, 2013, 17:48

सुशिक्षित बरोजगारांना नोकरी मिळावी, त्यांना नोकरीबाबत मार्गदर्शन करता यावं म्हणून राज्य सरकारतर्फे प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा रोजगार आणि स्वयंरोजगार केंद्र स्थापन करण्यात आलंय. मात्र सध्याच्या स्पर्धेच्या युगात आता या रोजगार केंद्रांना घरघर लागलीय.

बेरोजगारीत होणार वाढ

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 13:21

२०१२ मध्ये जवळजवळ ७.५ करोड तरुण बेरोजगार राहतील, असं ‘आंतरराष्ट्रीय श्रम संगठन’नं (आयएलओ) मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय.

रेल्वे परीक्षार्थींच्या मदतीला मनसेचं 'इंजिन'

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 17:24

येत्या ६ तारखेला रेल्वेभरतीची परीक्षा देणार असणाऱ्या मराठी तरुणांना मर्गदर्शन देण्यासाठी राज ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावली. रेल्वेच्या परीक्षांची तयारी करत असलेल्या मुलांपर्यंत मनसेतर्फे मार्गदर्शक पुस्तिका आणि सीडी पोहोचवण्याचं काम राज यांनी पदाधिकाऱ्यांवर सोपवलं आहे.

१० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 19:06

आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने (आयएलओ) २०१२ मध्ये जागतिक श्रम बाजारातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही परिस्थिती अत्यंत निराशाजनक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. आयएलओच्या मते येत्या १० वर्षांत ६० कोटी नव्या नोकऱ्या निर्माण करण्याची गरज आहे.