गुढीपाडव्याच्या शुभेच्छा `SMS`मधून करा व्यक्त!, GUDIPADVA SMS

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा `SMS`मधून करा व्यक्त!

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा `SMS`मधून करा व्यक्त!
www.24taas.com, मुंबई

आज गुढीपाडवा... चैत्र शुद्ध प्रतिपदा.. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त... मराठी नवीन वर्षाच्या `झी २४ तास`च्या तमाम वाचकांना आणि प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा... तर मग, आळस झटकून टाका आणि आजपासून उत्साहानं कामाला लागा... मित्र-मैत्रिणींना आणि आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा द्यायच्या विसरू नका... ते तुमच्या जवळ नसले म्हणून काय झालं... आपल्या भावना पोहचवण्याचं काम एसएमएस नक्की करू शकेल... नाही का!


श्रीखंड पुरी
रेशमी गुढी
लिंबाचे पान,
नव वर्ष जावो छान!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

भल्या सकाळी, गुढी उभारू
नवं वर्षाचे करू स्वागत
सामील होऊ शोभायात्रेत
आनंदाची उधळण करीत
"गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा"


सर्व रस्ते सजले आहेत,
छान सुंदर रांगोळ्यांनी.
शोभा यात्रा फुलुनी गेली,
माणसांच्या ताटव्यानी.
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”

रंग-गंधाच्या उत्सवात,
सामिल होऊ या सारेजण,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन,
साजरा करुया नव वर्षचा सण...
नव वर्षाच्या हार्दिक शुभेछ्या ..!!

उभरता आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी ,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा ,
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

गुढी उभारून
रूढी पाळुया
बांधा तोरण दारी !
नव वर्षाचे
करा रे स्वागत
चला खाऊया
श्रीखंड पूरी !
गुढी पाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा !

आयुष्याच्या वेलिवरती
फुले फुलावी स्वप्नाची
दुःख जाओ आनंद राहो
वाढो गोडवा नव्या दिनी
हीच शुभेच्छा पाडव्याची !
नूतन वर्षाभिनंदन !

आशेची पालवी ,
सुखाचा मोहर ,
समृद्धिची "गुढी ",
समाधानाच्या गाठी ,
नववर्षाच्या शुभेच्छा
तुमच्याचसाठी !

विश्वासाची काठी
विवेकाची वाटी
प्रयात्नाच्या गाठी,
उभारू हीच खरी,
गुढी यशाची दारी!
नूतन वर्षाच्या
शुभेच्छा !

उंच आकाशी उभारू गुढी
जपुया नाती, जपुया रूढी
वाढवू मैत्री स्ने्हाने
मने जिंकुया प्रेमाने !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

पालवी चॆत्राची
अथांग स्नेहाची,
जपणुक परंपरेची,
ऊंच उंच जाऊ दे गुढी
आदर्शाची ,सम्पन्न्तेची,
उन्नतीची आणि स्वप्नपूर्तीची!

"प्रसन्नतेचा साज घेऊन
येवो नविन वर्ष,
आपल्या जीवनी नांदो
समृद्धी, समाधान आणि हर्ष
गुढी पाडव्याच्या आपणास
"लक्ष लक्ष शुभेच्छा "

चॆत्राची सोनेरी पाहाट
नव्या स्वप्नाची नवी लाट
नवा आरंभ, नवा विश्वास
नव्या वर्षाची
हीच तर खरी सुरवात !

झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी, काय कोणी मिळविले?
पूर, दुष्काळ, वादळात, सर्वस्व गमाविले
थांबुवया हे सारे आपण, करुनी पुन्हा वृषारोपण
झाडे लावू, झाडे जगवू, वसुंधरेला पुन्हा सजवू
पर्यावरणाच्या गुढीसंगे, करू नववर्षाचे स्वागत
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”

First Published: Thursday, April 11, 2013, 08:24


comments powered by Disqus