नोकरीची संधी: कोकण विभाग एसटी, ९०० चालक पदं रिक्तJob Vacancies in Maharashtra ST Mahamandal for Driv

नोकरीची संधी:कोकण विभाग एसटी, ९०० चालक पदं रिक्त

<b>नोकरीची संधी:</b>कोकण विभाग एसटी, ९०० चालक पदं रिक्त
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

एसटीच्या चालक पदासाठी आठवी पासवरून दहावी पासची अट लागू केल्यानं एक वर्ष उलटलं तरी चालकांची संपूर्ण भरती होऊ शकली नाही. एसटीला कोकण विभागाचं सर्वाधिक टेन्शन असून, इथं चालक म्हणून कोणी पुढं येत नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळं खास कोकण विभागासाठी चालक पदाची पुन्हा जाहिरात काढण्यात येणार असल्याचं एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

ऑगस्ट २०१२मध्ये एसटीत चालक भरती झाली. ८ हजार ९४८ चालक पदांसाठी आठवी पासच्या ऐवजी दहावी पास ही शिक्षणाची अट ठेवण्यात आली. केंद्रानं नव्या नियमानुसार ड्रायव्हरसाठी शैक्षणिक अर्हता आठवी पासवरून दहावी पास केल्यानं राज्यानंही त्यात बदल आणले आणि त्यामुळंच ही अट एसटी महामंडळाला लागू करावी लागली.

या अटीमुळं आतापर्यंत ५ हजार ५२४ चालक मिळाले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती विभागात चालकांची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता आहे. मात्र, एसटी महामंडळाला सर्वाधिक टेन्शन आहे ते कोकणचंच. तिथं गेल्या वर्षापासून एसटीला एकही चालक मिळालेला नाही. प्रतिसाद मिळणार का? ९०० पदांसाठी जाहिरात काढून वर्ष लोटलं तरी कोकणातून एकही उमेदवार पुढं आला नाही. या पदांसाठी नव्यानं जाहिरात काढण्यात येणार आहे. या वेळी तरी त्याला प्रतिसाद मिळणार का, असा सवाल एसटीतूनच उपस्थित होत आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, December 10, 2013, 12:21


comments powered by Disqus