Last Updated: Thursday, May 29, 2014, 20:39
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई देशातील प्रतिष्ठित समजली जाणाऱ्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’मध्ये क्लेरिकल ग्रेडमध्ये असिस्टंट पदावर 5092 जागांसाठी भरती जाहीर झालीय.
इच्छुक उमेदवार 14 जून 2014 पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतात. याशिवाय जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी स्पेशल 125 जागा निघाल्यात.
योग्यता या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारानं कोणत्याही विषयातून पदवी संपादीत केलेली असणं आवश्यक आहे. शेवटच्या वर्षात शिकणारे विद्यार्थीदेखील या पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी वयोमर्यादा 20 वर्षांपासून 28 वर्षांपर्यंत निर्धारित करण्याता आलीय. एससी-एसटी वर्गातील उमेदवारांना वयात 5 वर्ष आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आलीय.
कसा करणार अर्ज इच्छुक उमेदवारांनी अगोदर बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर -
www.statebankofindia.com रजिस्टर करणं आवश्यक आहे. त्यानंतर उमेदवार ऑनलाईन फी जमा करू शकतात. रजिस्ट्रेशनसाठी शेवटची मुदत 14 जून 2014 पर्यंत दिली गेलीय.
जनरल आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना फीच्या स्वरुपात 450 रुपये आणि एससी-एसटी वर्गातील उमेदवारांना 100 रुपये फी म्हणून जमा करावे लागतील.
अधिक माहितीसाठी
www.statebankofindia.com आणि www.sbi.co.in या वेबसाईटवर जाऊ शकता.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा..
First Published: Thursday, May 29, 2014, 20:39