कोळीष्टकांपासून बनणार ट्यूब, वाहणार वीज!, spider web turns into tube for electricity

कोळीष्टकांपासून बनणार ट्यूब, वाहणार वीज!

कोळीष्टकांपासून बनणार ट्यूब, वाहणार वीज!
www.24taas.com, झी मीडिया, फ्लोरिडा

आता घऱातील कोळीष्टकं पाहून वैतागू नका. कारण एका नव्या शोधानुसार कोळीष्टकांपासून बनलेल्या सूक्ष्म ट्युब्समधून वीजेचा प्रवाह जाऊ शकतो. त्यामुळे फ्लोरिडा विश्वविद्यालयातील या शोधामुळे निसर्गातील घटकांचा वापर करून नवं संशोधन घडू शकतं.

संशोधक स्टीवन म्हणाले की जर आपण विज्ञानाच्या मुळाशी गेलो तर आपल्याला निसर्गातील अनेक रहस्य समजू शकतील. या संशोधनातून आम्ही नवं तंत्रज्ञान विकसित करू. नेचर कम्युनिकेशन्स या ऑनलाईन नियतकालिकात या संशोधनासंदर्भात माहिती दिली आहे. नॅनोट्युबचा वापर करून कोळीष्टकाच्या मदतीने कार्बनच्या एका अणुइतक्या जाड पटलातून वीज प्रवास करू शकेल. नॅनोट्युबची रुंदी मनुष्याच्या केसाच्या दहा हजारपट बारीक असते. जेव्हा एवढा लहान पदार्थ निर्माण होतो, तेव्हा त्याचं वर्तन विचित्र असतं.

या नव्या संशोधनाचा वापर अनेक ठिकाणी होऊ शकतो. ह्युमिडिटी सेंसर, वजन उचलण्यासाठी आणि विजेची तार म्हणून कोळीष्टक आणि नॅनोट्युबचा वापर होऊ शकतो. स्टीवन यांच्या संशोधनामुळे भावी काळातील तंत्रज्ञान मोठ् प्रमाणावर बदलणार आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 19, 2013, 18:13


comments powered by Disqus