विद्यार्थ्यांचा पोषक आहार समुद्रात student`s food in water

विद्यार्थ्यांचा पोषक आहार समुद्रात

विद्यार्थ्यांचा पोषक आहार समुद्रात

www.24taas.com, रत्नागिरी

शालेय विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्यी आणि गरोदर मातांसाठी देण्यात येणा-या पूरक आहाराची हजारो पाकिटे चक्क रत्नागिरी जिल्ह्यातल्या वेळास समुद्रात टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

मंडणगड लालुक्यातल्या वेळास समुद्रात अचानक धान्याचा पिशव्या तरंगत असल्याची बातमी सर्वत्र पसरली आणि एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी लगेच समुद्रावर धाव घेतली असता शालेय पोषण आहाराच्या या पिशव्या असल्याचं लक्षात आलं. काही लोक या पिशव्या घरीही घेऊन गेले. जवळपास एक हजार पिशव्या समुद्र किना-यावर पडलेल्या असून या पिशव्यांवर महाराष्ट शासनाचा शिक्का असून यातल्या काही पिशव्या गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या पूरक आहाराच्या आहेत.

पोषण आहाराच्या या पिशव्या कोणी टाकल्या?याला जबाबदार कोण असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या धक्कादायक प्रकारानंतर एकात्मिक बालविकास खात्याच्ये अधिकारी मात्र शांतच असल्यानं या प्रकारचे गूढ अधिकच वाढलंय.

First Published: Sunday, September 9, 2012, 19:24


comments powered by Disqus