तरुणाईमध्ये 'व्हॅलेंटाईन्स डे'चा उत्साह - Marathi News 24taas.com

तरुणाईमध्ये 'व्हॅलेंटाईन्स डे'चा उत्साह

विशाल करोळे, www.24taas.com, औरंगाबाद
 
आज १४ फेब्रुवारी आहे. म्हणजेच आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि व्हॅलेंटाईन डे म्हटलं की तरुणाईमध्ये जणू एक नवा उत्साह संचारतो. आपल्या प्रिय व्यक्तीला खास गिफ्ट देण्यासाठी एक वेगळीच लगबग सुरू असते.
 
तमाम प्रेमी युगुलं वर्षभर ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात तो म्हणजे व्हॅलेंटाईन डे. म्हणूनच आपल्या प्रिय व्यक्तीला अगदी हक्कानं आपल्या प्रेमाची कबुली देण्याबरोबरच अगदी खास गिप्टही द्यायलाच हवं ना. तरुणाईची हिच नस ओळखून विक्रेत्यांनीही आपली दुकानं आकर्षक गिफ्ट्सनी भरगच्च भरून ठेवली आहेत. गुलाबांच्या फुलांना तर खास मागणी आहे.
 
व्हॅलेंटाईन डेला विरोध करणारे राजकीय पक्षही सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यग्र आहेत. त्यामुळं तरुणाईला यंदाचा व्हॅलेंटाईन डे राजीखुशीने आणि अधिक आनंदाने साजरा करण्यात येत आहे.

First Published: Tuesday, February 14, 2012, 08:24


comments powered by Disqus