रेल्वे भरती : ६ मेपासून लेखी परीक्षा - Marathi News 24taas.com

रेल्वे भरती : ६ मेपासून लेखी परीक्षा

www.24taas.com, मुंबई
 
रेल्वेमध्ये नोकरी करण्याची संधी चालून आली आहे. मध्य व पश्‍चिम रेल्वेमध्ये ‘डी’ ग्रुप पदांसाठी ही भरती होणार आहे.  त्याची लेखी परीक्षा ६ मेपासून सुरू होत आहे. दहा हजार जागांसाठी ही परीक्षा होत आहे.
 
 
मध्य आणि पश्‍चिम रेल्वे रिक्रूटमेंट सेलद्वारे डिसेंबर २०१० मध्ये  ‘डी’ ग्रुपमधील खलाशी, गँगमन, ट्रॅकमन, सफाई पदांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. दहा हजार जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. मध्य रेल्वेमध्ये दोन हजार तर पश्‍चिम रेल्वेमध्ये आठ हजार जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा होत आहे.
 
 
६ मे, १३ मे, २७ मे, ३ जून, १० जून, २४ जून  या तारखेला परीक्षा होणार आहे. परीक्षेची वेळ सकाळी ९.३० वा. राहणार आहे. परीक्षेला जाताना सोबत  परीक्षेचे मूळ प्रवेशपत्र सोबत घेऊन जावे, परीक्षा  पत्रांवर स्वत:चे छायाचित्र असणे आवश्यक आहे., शक्यतो काळा शाईच्या बॉलपेनने उत्तरपत्रिका लिहाव्यात, योग्य उत्तरापुढे असे ठळक गोल करणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेमध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे माहिती भरणे गरजेचे असणार आहे.

First Published: Friday, May 4, 2012, 13:33


comments powered by Disqus