Last Updated: Saturday, June 9, 2012, 20:12
दिनेश पोतदार www.24taas.com पाहुयात, या आठवड्यांत शेअर बाजारात आलेले चढ-उतार, घेऊयात या आठवड्यांतील विविध सेक्टर्सची कामगिरीची माहिती तसचं व्यवहार करताना काय काय काळजी घ्यायला हवी यावर टाकुयात एक नजर... शेअरबाजारातील चढ-उतारसरत्या आठवड्यात शेअर बाजारात तेजीचं वातावरण होतं. आठवड्यातल्या पाचही दिवसांत बाजार वधारलेला होता. मंद होत असलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, येत्या १८ जूनच्या तिमाही आढाव्यात, रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदरात कपात करण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे, या आठवड्यात बाजारात तेजी होती. अर्थव्यवस्थेत चैतन्य आणण्यासाठी पायाभूत क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याचा इरादा पंतप्रधानांनी बोलून दाखवला, त्याचा तेजीला हातभार लागला. आठवड्यात सेन्सेक्स सुमारे साडेसातशे अंशांनी वधारला होता. आढवड्याच्या सुरुवातीला, सोमवारी बाजारात सकारात्मक बदल दिसून आला. व्याजदर पुन्हा कमी होण्याच्या शक्यतेमुळे बार्गेन हंटींग म्हणजेच कंपन्यांचे शेअर्सचे भाव कमी होऊन त्यांच्या एकूण खरेदीत वाढ झाल्यामुळे सोमवारी तुलनेनं २३ अंशांची वाढ दिसून आली. मंगळवारी दिवसभर खाली वर हेलकावणाऱ्या बाजारात फक्त ३२ अंशांची वाढ दिसून आली. पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याच्या पंतप्रधानाच्या निवेदनामुळे बुधवारी बाजार तब्बल ४३३ अंशांनी वधारला. गुरुवारीही बाजारातली तेजी कायम होती आणि बाजार १९४ अंशांची वाढ झाली. शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी तेजी कायम राहिली आणि बाजार ६९ अंशांनी वधारला.
विविध सेक्टर्सची कामगिरीसरत्या आठवड्यात मुंबई शेअर बाजारातल्या प्रमुख १३ सेक्टर्सपैकी कन्झ्युमर ड्युरेबल्सचा अपवाद वगळता सर्व सेक्टर्स तेजीत होते. पहिल्यांदा वळुयात ऑटो स्टॉक्सकडे. गुंतवणूक कंपनी हिरो इन्वेस्टमेंटच्या विलिनी
करणाच्या प्रस्तावाला मान्यता दिल्यामुळे मोटारसायकल उत्पादक कंपनी हिरोमोटोकॉर्पचे स्टॉक्स वधारले होते. लहान कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकी इंडिया, भारतातील सर्वाधिक व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्स, भारतातील सर्वाधिक युटीलिटी वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा, या प्रमुख ऑटो कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये तेजी होती.
यानंतर एक नजर टाकुयात बॅकांच्या स्टॉक्सकडे. चलनविषयक धोरणाच्या तिमाही आढाव्यात आरबीआयकडून व्याजदर कमी होण्याच्या शक्यतेमुळे, व्याजदराबाबत संवेनसील असणाऱ्या बँकांच्या स्टॉक्समध्ये या आठवड्यात तेजी होती. व्याजदर कमी झाल्यास घरांच्या मागणीत वाढ होण्याच्या शक्यतेमुळे रियॅलीटी क्षेत्रातही तेजी होती. सर्वाधिक मोठी रियॅलिटी कंपनी डीएलएफचे स्टॉक्स वधारले होते. कंपनीच्या शेअर बायबॅक प्रोगामच्या ताज्या यशामुळे इंडेक्स हेवीवेट रिलायन्सच्या स्टॉक्समध्येही वाढ दिसून आली. केरळमध्ये मॉन्सुनचे आगमन आणि त्यामुळे ग्रामीण भागातील ग्राहकांच्या खर्चात वाढ होण्याच्या शक्यतेमुळे FMCG म्हणजेच ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्येही आठवड्यात तेजी होती. एल एण्ड टीच्या जहाजबांधणी सबसा
यडरीनं नव्यानं ऑर्डर्स मिळवल्यामुळे इंजिनियरींग आणि कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील प्रमुख कंपनी एल एण्ड टी चे स्टॉक्स वधारले होते. उर्जा उत्पादक क्षेत्रातली प्रमुख कंपनी भेलचे स्टॉक्सही तेजीत होते. तांबं आणि एल्युनियमचा प्रमुख ग्राहक असलेल्या व्याजदारात कपात केल्यामुळे प्रमुख तांब आणि एल्युमिनियम कंपनी स्टर्लाईट इंडस्ट्रीजचे स्टॉक्स वाढलेले होते. सेन्सेक्स पॅकच्या तीसही कंपन्या सरत्या आठवड्यात तेजीत होत्या. कन्झ्युमर ड्युरेबल्सचा अपवाद वगळता, ऑटो, बॅका, कॅपिटल गुड्स, FMCG, हेल्थ केअर, आयटी, मेटल, ऑईल आणि गॅस पॉवर, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या, रियॅलिटी आणि टेक के हे प्रमुख सेक्टर्स सरत्या आठवड्यात तेजीत होते.
व्यवहाराबाबत घ्यायची काळजीशेअर बाजारात व्यवहार करताना गुंतवणूकदारांना महत्त्वाची संकल्पना आणि योग्य माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असतो. या आठवड्यात शेअरबाजारात व्यवहारात करताना जोखीम किंवा धोका टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी, यावंर बोलणार आहोत. शेअरबाजारात गुंतवणूक करताना सावधानता बाळगायची पहिली गोष्ट म्हणजे बाजाराबाबत कानावर पडणाऱ्या माहितीवर अवलंबून राहू नका, कानावर पडलेली प्रत्येक माहिती अचूक असेलचं असे नाही. योग्य विश्लेषण आणि तज्ज्ञांचा सल्लांच्या आधारेचं शेअर खरेदी करा. दुसरी बाब म्हणजे असंख्य व्यवहारांमुळे बाजार दिवसभर वरखाली होत असतो, बाजारातल्या तात्पुरत्या घडामोडीमुळे प्रभावित होऊन दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी खरेदी केलेले शेअर्स, किंमत कमी किंवा जास्त झाली असता अचानक विकू नका. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त हाव बाळगू नका. एखाद्या शेअर्सचा भाव एखाद्या दिवशी चांगला वाढलेला असेल तर तो विकून टाका आणि माफक नफा कमवा. आणखी काही दिवसांनी तो तिप्पट चौपटीनं वाढेल, या आशेने तो शेअर्स राखून ठेऊ नका. चौथी गोष्ट म्हणजे फायदेशीर नसलेले शेअर्स वेळच्या वेळी विकून टाका. भविष्यात अजिबात आशादायी नसलेले शेअर्स बाळगू नका, लाभदायक नसणारे शेअर्स वेळीच विकून टाका. पाचवी बाब आहे, संयम, सातत्य आणि विश्वेषण ही व्यवहाराची त्रिसूत्री आहे. संयम आणि सातत्य बाळगून जास्तीत जास्त वेळ विश्लेषणात घालवा. खरेदी- विक्रीसाठी अत्यंत कमी वेळ लागतो.
.
First Published: Saturday, June 9, 2012, 20:12