‘आदर्श’ वाढतोय, गाजतोय आणि बडवला जातोय - Marathi News 24taas.com

‘आदर्श’ वाढतोय, गाजतोय आणि बडवला जातोय


प्रसाद घाणेकर
www.24taas.com,  मुंबई
 
‘आदर्श’ सोसायटी घोटाळा वाढतोय, गाजतोय, वाजतोय आणि बडवला जातोय. जेवढं झाकलं जातयं तेवढं उघडं होतंय. चौकशी आयोगासमोर येणारे ‘चार बोटं’ आपल्याकडे ठेवून एका बोटाने दुस-याचंनाव सूचकरणे सुचवत आहेत. ‘तू-तू मै-मै’बरोबर ‘तो-तो’चा आणि ‘तो मी नव्हेच’ करत ‘सही रे सही’चं नाट्य रंगलंय. मीडियाने तर बातम्या देण्याचं काम चोख बजावलंय.वर्तमानपत्रात आदर्शबाबत रोज एक बातमी उगवतेय. तर चॅनेलवाले चर्चा, महाचर्चा आणि विशेष चर्चा घडवत आहेत. उशिरा का होईन सत्य नेहमीप्रमाणे ‘शेवटी’च बाहेर येणार. पण आज पिंपळाच्यापारावर ‘सप्तजणां’ची बैठक बसली होती आणि तिचा आजचा विषयही होता आदर्श सोसायटीघोटाळा. चर्चेसाठी राजकीय पटलावर नेहमी वावरणारे बाबा राजगिरे, गल्लीबोलात समाजसेवा करणारे दादासमाजे, सर्व गोष्टींबाबत विश्लेषणाची बाजू मांडणारे जागृत विचारे, टीव्ही अँकर नेहा नटवे, कशाचीही भीडभाड न राकता-चूक की बरोबरयाची तमा न बालगता बोलणारे सत्या परखडे, स्वत:चे वर्तमानपत्र चालविणारे आणिसंपादक म्हणून काम करणारे राजा संपादके आणि नेहमीच शेवटी बोलणारे आणि सामान्यांचेप्रतिनिधी करणारे सदा सामान्ये.
 
पिंपळाच्या पारावर बैठकीला सुरुवात झाली. जवळच्या चहावाल्याकडूनअद्रक मार के चहा मागवला. चहाचा घोट घेत राजा संपादके बोलले, ‘वा ssss काय फक्कड चहा झालाय. एकदम झकास. फर्स्ट क्लास. अद्रकचा मस्त वासयेतोय.’ काय बाबा राजगिरे, काय धापा मारताय. अहो. अद्रकचा नाही आदर्शचा वास येतोय.’ सत्या परखडे परखडपणे बोलले. परखडेंचा स्वभाव तसा परखड आणिथोडासा तापट. सत्य काय, असत्य काय,  चूक काय, बरोबर काय, याचा सारासार विचार करणं त्यांच्यास्वभावात नाही. जे काय बोलायचं ते तेथल्या तेथेच. ताडफाड हिशेब आणि तत्काळ रिझल्ट.‘आsssय’, बाबा राजगिरे तोंडावर हात ठेवतम्हणाले. परखडेंच्या ओरखड्याने बाबांच्या तोंडाला चटका बसला.
 
‘जाऊ द्या हो राजगिरे, तुम्ही लक्ष देऊ नका परखडेंकडे,’ 'अनाकलनीय' वर्तमानपत्राचे संपादक राजा संपादकेमधेच बोलले. अहो संपादके, जाऊ दे काय, जेव्हापासून आदर्श सोसायटीचा घोटाळागाजतोय ना त्या दिवसापासून हा परखडे माझ्याकडे परखड, पारखी आणि संशयी नजरेने पाहतोय. माझंनाव बाबा आहे, मी आदर्शचा बाबा नाही. हवं तर आबांना विचारा.’ बाबा राजगिरे जरा जोशातच बोलले. राजगिरेंचा रोख आपल्याकडे आहे हे पाहून परखडे हातावर हात आपटत म्हणाले,‘अहो राजगिरे, तुमची सवयच तशी आहे. स्वत:चं ठेवायचंझाकून, दुस-याचंही ठेवायचं दाबून आणि नको त्याचं दाखवायचं उघडून.’
 
अय्या sss, वा काय बाईट आहे परखडे तुमचा. जबरदस्तटोला लगावलात हो बाबांना.’ मानेला जरासा झटका देत हातातील कंगवा बूमसारखा पुढे करत टीव्हीअँकर नेहा नटवे जरा हटकेच बोलली.  तिच्या या अचानक बोलण्याने सर्व जण तिच्याकडे पाहतच राहिले.अँकरिंग करताना जेवढा होश दाखवला नव्हता तेवढा जोश आता नेहा नटवेला चढला होता.
 
या नटवेला काय बोलावे, याचा राजा संपादके विचार करत असताना आतापर्यंत गप्प बसलेले दादासमाजे सावकास व संमजसपणे म्हणाले,‘बेटा नटेव, बाबा पक्के राजकारणी आहेत. त्यांचा स्वभाव हा स्थायी नसला तरीअस्थायी म्हणजेच सरड्याच्या रंगासारखा बदलणारा आहे. आणि वयाचा विचार करता परखडेजरी त्यांना बोलले तरी तू अती उत्साह दाखवू नकोस. नाय, काय असतं नव्या दमाच्या पोरींमध्येउत्साह जास्त असतो.’ दादांच्या बोलण्याने थोडी वरमलेली नटवे परखडेंच्या तोंडाजवळ असलेलाकंगवारूपी बूम तसाच ठेवत म्हणाली,‘सॉरी...सॉरी समाजेजी,.. म्हणजे मला काय म्हणायचंय माझा आवाजतुमच्यापर्यंत पोहोचला हेच मोठं. धन्यवाद.’
 
‘परखडे आणि नटवे तुम्ही जरा धीर धरा. असं उतावळी होऊ नका. शेवटी सर्व प्रश्न हे विचारविनिमय करूनच सुटतात आणि सोडवायचेअसतात. आता राजकारण्यांनी ठरविलेल्या त्यांच्याच हातात असणाऱ-या यंत्रणा तपास करतआहेत ना...मग आपण एक नागरिक म्हणजे सुशिक्षित नागरिक म्हणून सत्य जगासमोरयेईपर्यंत शांतपणे वाट पाहिली पाहिजे, प्रतीक्षा केली पाहिजे.’ ग्लासमधील चहा संपवत आतापर्यंतशांतपणे ऐकणार आणि फेमस विचारवंत जागृत विचारे यांनी आपली बाजू मांडली.‘विचारे, तुमचं विचारमंथन होईपर्यंत दुसराघोटाळा बाहेर पडेल. सत्य जगासमोर येईपर्यंत जग तरी सत्याचं राहिलं पाहिजे की नाही?’ परखडेंनी विचारेंच्या विचारावर आपलाविचार मांडला.
 
‘परखडे तुम्ही असं कसं म्हणता? त्यात माझी काय चूक? मी राजकारणी असलो तरी माझा त्याच्याशी काहीही काडीचा संबंध नाही.उगाच नाहक गोवण्याचा प्रयत्न करू नका.’ बाबा राजगिरेंचाही आवाज थोडा वाढला. इतक्यात दोघांनाही थांबवत राजा संपादके मधे पडले, ‘तुम्ही दोघेही शांत व्हा बघू. आपणचर्चा करायला आलो की भांडायला? साधकबाधक चर्चा करून मार्ग काढायलाहवा यातून. तशी चर्चा झाली पाहिजे की नको?’ ‘वा संपादकेसाहेब, म्हणजे चॅनेलवर चालते तशी चर्चाम्हणाताय ना...’ नेहा नटवेने मधेच नाक खुपसायच्याअगोदर तोंड खुपसले.‘विधिमंडळात आजकाल फ्रीस्टाईल चर्चाकेली रंगते. चर्चेचा आखाडा होतो. अशी चर्चा करू नये. राजकारण बाजूला ठेवून एखाद्याविषयावर मुद्देसुद चर्चा झडली पाहिजे. आरोप-प्रत्यारोप करू नयेत. चर्चेने एखादाविषय सुटू शकतो याच्यावर विश्वास असायला हवा नव्हे, जनसामान्यांचा त्याच्यावर विश्वास बसायला हवा,’ विचारेंना अगदी जागृतपणे विचारमांडले.
 
‘विचारे, तुम्ही एकदम सत्य बोललात. लोकशाहीतलोकशाहीच असायला हवी. आणि साधकबाधक चर्चाच व्हायलाच हवी. मी तर म्हणेनआदर्शप्रकरणी आदर्शवत चर्चा घडवून सरकारने आदर्श घातला पाहिजे म्हणजे आदर्श असा पायाघातला पाहिजे. अन्यथा, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करूआणि आबा, दादा, काका, मामा यांना एकदाच इशारा देऊ,’ समाजसेवेचे व्रतस्थ समाजे धीरगंभीरपणेबोलले. विचारेंच्या मतात समाजेंचे विचार एकरूप होऊ लागले. ‘एकदम बरोबर बोललात, समाजे. हे तुम्ही अगोदर आमच्याकडे प्रसिद्धीसाठी द्या. आम्ही हवीतशा हवा तयार करतो. वाताची निर्मिती करू शकतो. मग बघा काय होते ते ? वर्षभर गाजणारा आदर्श घोटाळाचुटकीसारखा सुटला की, त्याच्यावर एक मस्तपैकी संपादकीयलिहूनकाढतो,’ संपादक जरा उत्साहातच बोलले. पण संपादकांच्या या संपादकीयची परखडेंनी चिरफाड करायला सुरुवात केली.
 
‘अहो संपादके, तुम्ही काय खरडता संपादकीय?’ परखडे.
‘काय खरडतो म्हणजे...चक्क लिहितो.’- संपादके.
‘...हा तेच ते...बरेचसं तुमच्या वर्तमानपत्राच्या नावाप्रमाणेअनाकलनीयच असतं. असंही म्हणायचं आणि तसंही म्हणायचं.’ परखडेंनी संपादकेवर सूडच उगवला.
 
‘अहो, आम्ही आमची भूमिका मांडतो. सर्वसामान्यांची भूमिका असते ती.तुम्हाला नाय कळणार परखडे.’ संपादके म्हणाले.
‘म्हणूनच अनाकलनीय म्हणतो मी. म्हणतात भूमिका मांडतो...अहो तीभूमिका चावला तरी बरी भूमिका करते.’ परखडे पुन्हा बोलले.
‘काहीही असो. वर्तमानपत्राने बातमीप्रकाशित केली आणि आदर्शचा अनादर्श जगासमोर आला. घोटाळा बाहेर काढण्याचं श्रेयख-या अर्थाने आमचं आहे आणि आम्ही ते आमचं कर्तव्य समजतो.’ संपादके मोठ्या फुशारकीत बोलले.
 
‘छे ओ...तुम्ही फुशारकी मारू नका...आदर्श घोटाळा आम्ही टीव्हीवाल्यांनी एवढा पिटलाय म्हणून सांगू...आदर्श घोटाळा सर्वस्तरांत, घराघरांत पोहोचवला. आदर्शबाबत येणारी प्रत्येक बातमी आम्ही ब्रेककेली. आणि सर्व नेत्यांचे बाईट घेतले अगदी वाईट वाटले तरी.’ नेहा नटवे अतिउत्साहातच मानेला लचकेआणि गचके देत बोलली. बोलण्याच्या नादात डोळ्यावर आलेली बट मागे करत संपादकेंना कसंकापलं याच्या आनंदात ती सांडून गेली.
 
एवढ्यात जागृत विचारे आपल्या विचारांची पुंजी पुढे करत म्हणाले, ‘मीडियाने असं भांडू नेय. शेवटी हालोकशाहीचा चौथा खांब आहे. पण काहीही असो, या आदर्शप्रकरणात सीएम-बीएम, मंत्री, संत्री, लिंबू, टिंबू सर्वच अडकले. अशा नेत्यांकडूनअशी अपेक्षा नव्हती पण अपेक्षाभंग करणं हा नेत्यांचा आता नित्यधर्म होत चाललाय.ज्याला आश्वासन असं गोंडस नाव दिलं जातंय… स्वार्थाची पोळी भाजत आहेत. चौकशी आयोगासमोर ‘सही रे सही’पासून बरीच ‘बनवाबनवी’ होत आहे. पुरोगामी आणि अग्रेसर अशामहाराष्ट्राच्या नेत्यांकडून अशी अपेक्षा नव्हती. आपण एवढे घोटाळे करून ठेवलेत की, भविष्यात विद्यार्थी पीएचडीसाठी घोटाळा हा विषय निवडतील.एवढं दुर्दैव महाराष्ट्राच्या वाट्याला येणं ही राज्यासाठी शान, मान, जान, प्रतिष्ठा लयाला जाण्याची लक्षणंआहेत.’
 
‘एकदम बरोबर बोललात विचारे, मी तुमच्या मताशी बावनकशी सोन्यासारखासहमत आहे. सर्व यंत्रणांनी योग्य आणि निष्पक्षपाती चौकशी केली पाहिजे. आणि तसंनाही झालं तर आझाद मैदान जास्त दूर नाही. ‘समाजसेवेचे व्रत न घेतले मी अंधनते’, दादा समाजे शांतपणे आणि निर्धारानेम्हणाले. यांच्या या सर्व चर्चेने सत्या परखडेंची खोपडी सनकली. त्यांनी दात, ओठ खात मानेच्या शिरा ताणल्या.तळपायाची आग मस्तकाला भिनली,
 
‘अहो महाशय, पुरे झाले तुमचे हे आदर्श रामायण आणिमहाभारत. आदर्श घोटाळ्यावर नव्याने महाभारत लिहिता येईल एवढा ऐवज सीबीआयकडे जमाझालाय. महाभारतातील एका एका पात्रावर सिनेमा काढता येत असला तरी आदर्श घोटाळ्यातीलपात्रांवरून लघुपट नक्कीच निघेल. आणि काय हो, समाजे, उपोषण करुन काय राशी पाडणार ? या घोटाळ्यातील मंत्र्यांचे, संत्र्यांचे राजीनामे घेणार ? अहो, देतील राजीनामे...काही दिवसांसाठी...महिन्यांसाठी... त्याने काय फरक पडणार आहे... त्यांचे काही दिवसांनी राजकीयपुनर्वसन होईलच ना... त्यांचे पुनर्वसन प्रस्तापितांच्या पुनर्वसनासाऱखेवर्षानुवर्षे कुजणार नाही,’
 
सत्य परखडेंचा अवतार आणि आवेश पाहून राजगिरेंचे बोलण्यासाठीउगडलेले तोंड तसेच उघडे राहिले. विचारे डोके खाजवत होते. संपादकेंनी खिशाला पेनलावला. नेहा नटवेंची चुळबुळ सुरू झाली. समाजे स्तब्ध होते. इतक्यात येवढ्यागदारोळात एक शब्दही न बोलणारे सदा सामान्ये बोलते झाले, ‘आदर्शच्या चर्चेसाठी जमलो होतो. चर्चाभरकटवायची परंपरा पारावरही आहे. शेवटी काय एकमेकांच्या नावाने खडे फोडत चर्चेचेगु-हाळ असंच सुरू राहील आणि हाती मात्र धुपाटणंच येईल. चौकशीसाठी मात्रसामान्यांचा पैसा खर्च झालेला असेल.
 
देव आणि दैत्यांनी सागरमंधन केलं तेव्हा त्यातून निदान अमृत आणिहलाहल तरी बाहेर पडले, पण आदर्शच्या मंथनातून सत्य बाहेर येईल की नाही याची शंकाआहे... नाहीतर सत्य बाहेर येईपर्यंत चौकशी आणि चर्चांचे मंथन मात्र सुरूच राहील.’
 
 

First Published: Friday, July 13, 2012, 15:21


comments powered by Disqus