Last Updated: Friday, July 13, 2012, 15:21
प्रसाद घाणेकर
‘आदर्श’ सोसायटी घोटाळा वाढतोय, गाजतोय, वाजतोय आणि बडवला जातोय. जेवढं झाकलं जातयं तेवढं उघडं होतंय. चौकशी आयोगासमोर येणारे ‘चार बोटं’ आपल्याकडे ठेवून एका बोटाने दुस-याचंनाव सूचकरणे सुचवत आहेत. ‘तू-तू मै-मै’बरोबर ‘तो-तो’चा आणि ‘तो मी नव्हेच’ करत ‘सही रे सही’चं नाट्य रंगलंय.