Last Updated: Thursday, February 16, 2012, 12:31
मंदार परबसंपादक, झी २४ तासप्रदीर्घ काळानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी मराठी मनाचा वेध घेणाऱ्या झी २४ तास या मराठमोळ्या चॅनलची निवड केली. या EXCLUSIVE मुलाखतीतील प्रश्नोत्तर जसेच्या तसे....
भाग- १
गेली ४५ वर्षे तुम्ही राजकारण पाहत आहे, तुम्हांला कसे वाटते आहे. बाळासाहेब – गेली ४५ वर्ष मी जेव्हापासून शिवसेना स्थापन केली, तेव्हापासून आतापर्यंत मला असं वाटतं केवळ महाराष्ट्राचं नाही तर देशातच वातावरण भयानक... भयानक बिघडतं चाललंय... देश अराजकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. कोणाचा कुणाला मागमूस राहिलेला नाही..आपल्या देशात सरकार आहे की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती सर्व राज्यात आहे. एक दोन तुरळक राज्य असतील जिथे परिस्थिती जरा चांगली आहे. पण बाकी काय????
शिवसेनेची वाटचाल कशी पाहतात तुम्ही?बाळासाहेब – शिवसेनेची ‘वाट’ ही चांगली आहे आणि ‘चाल’ही चांगली आहे. बरं काय! शेवटी काय असतं पाऊस पडला तरी आणि पाऊस नाही पडला तरी दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांचे हाल होत असतात. ज्या ठिकाणी चांगलं पीक असेल अशा ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो, आणि उभी राहिलेली शेती पाण्यात जातात. असे काही तरी होतं. आम्ही काही चांगल्या गोष्टींचा विचार करून उभं राहिल्यावर काही घाणेरड्या गोष्टी चालतात. त्यात आमचं चांगल पीक त्यांना दिसत नाही. आम्ही काय चांगल उगवलं आहं. ते दिसत नाही. त्यामुळे आमच्या वाईट गोष्टी त्यांना वाईट दिसतात, आणि चांगल्या गोष्टीही त्यांना वाईट दिसतात.
मग त्याची कारणं काय वाटतात तुम्हांला?बाळासाहेब – दुःसाहस! इथं राजकारण फार खदखदायला लागलेलं आहे. पूर्वी समाजकारणातून राजकारण केले जायचं. काही नावे घेतो आपण नेहमी, काही ठिकाणी आपली मराठी माणसं बिहारमधून निवडून आली होती. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. भाषावार प्रांत रचनेच्या भिंती उभी राहिल्या आहेत. आम्ही कमकुवत मनाचे झालो आहोत. आपण कोत्या बुद्धीचे झालो आहोत. 'मी'चा कसला अभिमान बाळगता. मी हा तुमचा अभिमानाचा आहे की अहमगंडाचा आहे. हे तपासून पाहिले पाहिजे. ज्यांची कुवत नाही असे राज्यकर्ते तुमच्या बोडक्यावर बसले आहेत. आपण त्याचा स्वीकार केला आहे.
मग यात दोष कुणाचा आहे. जनतेचा आहे की आणखी कुणाचा आहे?बाळासाहेब – जनतेचा म्हणण्यापेक्षा का हो इतकं तुमच्यासमोर नाचतं आहे. तुम्हांला दिसत नाही. आता चिंदमबरम क्लिनचीटने सुटले! अजून सुटले नाही मी म्हणेल! अण्णा हजारे तिकडे भ्रष्टाचाराविरोधात आंदोलनाला बसायचे. पण मला सांगा कोणाला भ्रष्टाचार हवा आहे. भ्रष्टाचार नकोय! भ्रष्टचार नकोय! असे सर्व म्हणायचे. सिनेमा नट-नट्या ही 'मै अण्णा हजारे हूँ 'असे म्हणत टोप्या घालून फिरायचे. निवडणुकीच्या तोंडावर एवढा या काँग्रेसने देशाचा बट्याबोळ केला. त्याचं काय? तुम्ही निवडणूक कशाला देतात हो त्यांना? त्यांच्या हातावर कसले डाग आहे. मोबाईल द्यायचे. (मोबाईलचे लायसन्स). आजच एक बातमी आली आता साड्या वाटणार नाही. म्हणजे आतापर्यंत काय नागडे फिरत होते लोक! निवडणुकीच्या तोंडावर हे काय वाटप सुरू आहे. याने तुम्ही बाटतात आणि दबून काँग्रेस एके काँग्रेस करतात. काही शेंड्या त्यांच्या हातात आहे बँकांसारख्या. शेतकऱ्यांना कर्ज दिल्याच्या ह्यांच्या त्यांच्या.... सावकारी नष्ट होत नाही. सावकारचं यांच्या ताब्यत आहे. मग अशा वेळेस शेतकऱ्याला धमकविण्यात येते, तू जर मतदान केलं नाही तर तुझ्या शेती-घरावर टाच आणली जाईल. काँग्रेसने हे काही केलं आहे, ते समजून उमजूनही काँग्रेसला असे मतदान होते. भ्रष्टाचार नष्ट होत नाही तोपर्यंत कसली काही अपेक्षा करू नका, हेच चालू राहणार!
तुम्हांला वाटतं का निवडणुका बदलत चालल्या आहेत?बाळासाहेब – ह्या कसल्या निवडणुका या निवडणुकाच नाही. काल परवाकडे आलेले पक्ष लाखांच्या बढ्या घेतात. तुम्हांला माहिती तरी आहे का कोण हा उमेदवार आहे. एकदम ५० हजार, १ लाख इतके... कसे दानशूर झाले मतदार. आली कुठून ही मतं? पूर्वीची गावठी पद्धत होती, तीच योग्य होती. अमेरिकेनेही आपली पद्धत बदलून टाकली. इलेक्ट्रॉनिक सिस्टिम ही मोबाईल सारखीच आहे. समजलं. त्या पद्धतीने तुम्ही मतही बदलू शकता. इतकी पुढे गेली ही टेक्नॉलॉजी इतकी पुढे गेलेली आहे.
तुम्हांला असं वाटतं की ही खरी पद्धत नाही आहे. कुठेतरी फेरफार केली जाते आहे?बाळासाहेब – माझा विश्वास नाही. का? तर मुळात हे काँग्रेसवाले आहेत. हातात सत्ता आल्यावर इतक्या घाणेरड्या पद्धतीने त्यांनी वापरली आणि वाकवली. त्यामुळे तुम्हांला वाटतं की काय पार्टी कमाल आहे. पार्टी कमाल नाही, यंत्रातून निवडून आलेली आहे. हे खरं मतदान नाही. खऱं मतदान ते होतं. बरं होतं ते शिक्का मारायचा आणि मत द्यायचं.
तुम्हांला असं वाटतं का बराच मोठा वर्ग निवडणुकीत मतदान करतो आणि काही करत नाही, त्यामुळेच खरं चित्र बाहेर येत नाही.बाळासाहेब – लोकं किती गावाला जातात.... मतदानाच्या दिवशी! रविवारी मतदान असेल तर शुक्रवार, शनिवार सुट्ट्या काढून लोकं जातात गावाला... वाट्टेल तिथं... काही जण तर परदेशात जातात. नागरिक म्हणून तुम्हांला जी आपुलकी वाटायची, जबाबदारी वाटायची ती आता राहिलेली नाही. माझ्या मताला काय महत्त्व आहे, तेच कळत नाही. त्यामुळे तुम्ही सोकावलेले झाले आहात. मोठा वर्ग कोणता मोठा वर्ग मतदान करतो. तो मतदानाला उतरतही नाही.
राज्य व्यवस्थेवरून लोकांचा विश्वास उडाला का?बाळासाहेब – विश्वास उडाला….. विश्वास..... हे राज्यकर्ते नव्हेच. काय या सोनिया गांधीला कसली अक्कल आहे. परदेशी बा?ई.... तुमचे खासगी नाते आमच्या देशावर नका लादू... तुम्हांला पाहिजे ते कोणाशीही लग्न करा...असं चालत आलं आहे गांधी घराणे.... आणि हे करतात... हुजरे... मुजरे... या बाईची लायकी काय. आता कसा हेतुपुरस्सर, क्रुरपणे म्हणेन मी सीबीआयचा आणि थोड्याफार प्रमाणात कोर्टाचा किती वापर केला जातोय. खुद्द चीफ जस्टीसच बोलताहेत न्यायमूर्तींच्या बाबतीत. त्याच्याचे तारेशे आहेत. माझ्याकडे फाईलचं आहे. कोर्टाची आणि न्यायमूर्तींची मी फाईल बनवून ठेवली आहे. आठ न्यायमूर्ती.... आपलं अण्णाच्या टीममध्ये कोण आहेत तो....... शांती भूषण! त्याचंच नाव आलं आहे. त्याने पहिल्यांदा एक लिस्ट दिली होती. आठ दहा जणांची लिस्ट दिली होती. त्यात चीफ जस्टीसचं नाव होतं. सुप्रीम कोर्टाच्या.... काय आहे...... न्याय मागायचा कोणाकडे...
मग या व्यवस्थेचं करायचं काय? बाळासाहेब – करायचं काय?..... म्हणून मी म्हणतो ना अराजक! एक ना एक दिवस उसळी घेणार हे सगळं काही तरी.... चीनची तयारी चालू आहे... युद्धाची तयारी सुरू आहे. समुद्रात युद्ध नौका सज्ज आहे, विमानं तयार आहेत. गिलगेटला रेल्वे आणताहेत. आपला गिलगेट. नेहरुंच्या मुर्खपणामुळे. चीन तुमच्या देशात घुसलंय... रस्ते करतोय चीन... अत्यंत वाईट परिस्थिती केली या सरकारनं....
First Published: Thursday, February 16, 2012, 12:31