Last Updated: Thursday, January 26, 2012, 20:21
www.24taas.com, उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसच्या व्यंकट गुंड या उमेदवारानं ग्रामस्थांसाठी मटण आणि दारुची पार्टी ठेवली होती. आचारसंहितेची ऐशीतैशी 'झी २४ तास'नं दाखवल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे.
'झी २४ तास'च्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे आणि जिल्हा परिषदेचा काँग्रेस उमेदवार व्यंकट गुंड, त्याचा भाऊ आणि विद्यमान सदस्य सुधाकर गुंड आणि शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. लासोना गावातल्या संत ज्ञानेश्वर या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला होता.
प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येलाच ही पार्टी करण्यात आली. शाळेतच पंगतीच्या पंगती उठल्या. 'झी २४ तास'चा कॅमेरा पाहताच अनेक स्थानिक नेत्यांनी धूम ठोकली. आचारसंहितेची ही ऐशीतैशी झी २४ तासच्या कॅमेऱ्यात कैद झाली.
First Published: Thursday, January 26, 2012, 20:21