...आणि ‘मिशन एक्स’ कंप्लीट
कसाब आणि त्याचे सहकारी नऊ दहशतवाद्यांनी, २६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईच्या विविध भागांत हल्ले करून तब्बल चार दिवस मुंबईला वेठीस धरले होते. कित्येक निरपराध लोकांचे बळी गेले होते. याप्रकरणी कसाबला दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. मात्र, फाशी देण्यास उशीर होत असल्याने संतापाची भावना व्यक्त होत होती. फाशी देण्याचे ठरल्यानंतर `मिशन एक्स` हाती घेण्यात आले.
कसाबला फाशी देण्याबाबत सात नोव्हेंवर २०१२ ला केंद्रीय गृहमंत्र्यांची फाईलवर सही झाली. त्यानंतर फाशीबाबत हालचाल सुरू झाली.
...आणि ‘मिशन एक्स’ कंप्लीट
कसाबला फाशी देण्याबाबतची फाईल पुढे सरकली. ८ नोव्हेंबर रोजी कसाबची फाईल राज्य सरकारकडे आली.
...आणि ‘मिशन एक्स’ कंप्लीट
सर्व कागदोपत्री सोपस्कार झाल्यानंतर ८ नोव्हेंबर २०१२ लाच फाशी देण्याबाबत ठरले. त्यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली आणि `ऑपरेशन एक्स` असे नाव देण्यात आले. आणि `मिशन X`ला सुरूवात झाली.
...आणि ‘मिशन एक्स’ कंप्लीट
राज्य सरकारने कमालीची गुप्तता पाळून कसाबला मुंबईतील ऑथर रोड जेलमधून रात्रीच पुण्यातील येरवडा तुरूंगात हलविले. कसाबला फाशी देण्यासाठी ‘मिशन एक्स’ असे नाव देण्यात आले
अजमल कसाब याला फाशी देण्याचे निश्चित करण्यात आल्यानंतर २० नोव्हेंबर २०१२ ला मुंबईतील ऑथर जेल रोड तरूंगातून पुण्यातील येरवडा जेलमध्ये हलविण्यात आले.
...आणि ‘मिशन एक्स’ कंप्लीट
अजमल कसाबला फाशी देण्याची तयारी..
२१ नोव्हेंबर २०१२ रोजी पहाटे कसाबला फाशी देण्याची तयारी सुरू झाली.
...आणि ‘मिशन एक्स’ कंप्लीट
कसाबला फाशी देण्याची तयारी झाल्यानंतर पुण्यातील येवरडा तरूंगात २१ नोव्हेंबर २०१२ रोजी पहाटे अधिकारी पोहोचले
...आणि ‘मिशन एक्स’ कंप्लीट
पुण्यातील येरवडा तरूंगात कसाबला ७.३० वाजता फाशी देण्यात आले.
कसाबला फाशी देण्यासाठी ‘मिशन एक्स’ असे नाव देण्यात आले होते. हे मिशन पार पडल्याचा सकाळी ७.४५ वाजता गृहमंत्र्यालया फोन आला, ‘मिशन एक्स’ सक्सेस. त्यानंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून अधिकृत माहिती दिली. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येरवड्यात कसाबचे दफन केल्याचे सांगितले.
/marathi/slideshow/कसाब-मिशन-x-सक्सेस_168.html/18