गौरी- शाहरुखचे हिंदू पद्धतीने लग्न
बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खान आणि गौरी खान यांचा आज लग्नाचा २१ वा वाढदिवस. २१ वर्षापूर्वी शाहरूख आणि गौरीनं हिंदू पद्धतीने लग्न केलं होतं. शाहरूख आणि गौरी या दृष्ट लागण्याजोग्या गोड जोडीच्या सुखी संसाराची विशेष झलक खासकरून त्यांच्या चाहत्यांसाठी.
गौरी- शाहरुखची पहिली भेट
शाहरूख आणि गौरीची पहिली भेट दिल्लीत झाली होती आणि पहिल्या भेटीतच शाहरूख गौरीच्या प्रेमात पडला होता.
लव-अफेअर तब्बल सात वर्ष
सात वर्षाच्या रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर शाहरूख आणि गौरी यांनी २५ ऑक्टोबर १९९१ रोजी हिंदू पद्धतीने थाटामाटात लग्न केलं होतं
गौरीच्या घरातून लग्नाला विरोध
गौरी आणि शाहरूखच्या लग्नाला गौरीच्या घरातून विरोध असल्याने दोघांनी विधीवत लग्न करण्याआधी २६ ऑगस्ट १९९१ रोजी रजिस्टर पध्दतीनं लपून-छपून लग्न केलं होतं.
मुंबईत गौरीला शाहरुखने शोधले
एकदा गौरी शाहरूखला न सांगत मैत्रिणीसोबत मुंबई येथे आली होती, तेव्हा त्यावेळी शाहरूखला हे देखील माहित न्हवतं की गौरी नक्की कुठे राहत आहे? गौरीला समुद्रकिनारे फार आवडतात या एका माहितीवर शाहरूखने गौरीचा शोध घेतला होता.
गौरीने दिली शाहरुखला प्रत्येक प्रसंगी साथ
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये शाहरूख सुरूवातीला तसा स्ट्रगलच करत होता. पैशाचं खूप असं पाठबळ नसलेल्या माणसाबरोबर आपली मुलगी कसा संसार करणार आहे या चिंतेत गौरीचे पालक असताना गौरी मात्र शाहरूखच्या लढाईत त्याच्या अखंड पाठीशी उभी होती.
वचनपूर्ती
लग्नानंतरचे शाहरूख आणि गौरीचे दिवस खूप बेताचे होते. त्याच्या घरात बसण्यासाठी अगदी एखादा पलंग किंवा एक खूर्ची देखील न्हवती. गौरीच्या आईने घराची अवस्था पाहताच तिला खूप दुःख झालं होतं. पण शाहरूखनं गौरीला वचन दिलं होती की एक दिवस तुझ्या पायाजवळ सगळ्या सुखसोयी आणून देईन आणि वचन पूर्ण झालंही.
गौरीचा रोल
गौरी आणि शाहरूखही आपल्या संसारात अतिशय आनंदी आहेत. गौरी शाहरूखच्या होमप्रॉडक्शनमध्येही काम करून लागली, त्यामुळे तिच्या आई-वडिलांचा विरोध नंतर मावळला.
गौरी-शाहरुखचं छोटं कुटुंब
गौरी आणि शाहरूख या जोडप्याला साजेसा असा मुलगा आर्यन आणि गोड मुलगी सुहाना आहेत.
मुलांसाठी वाट्टेल ते....
शाहरूखला आपल्या मुलांना खूश ठेवण्यासाठी त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी ऐकत असतो. आपल्या मुलासाठी त्याने रा-वन हा स्पेशल इफेक्टचा चित्रपट काढला.
/marathi/slideshow/किंग-खान-शाहरुखच्या-लग्नाचा-वाढदिवस_158.html/18