भगवान विष्णूचा आठवा अवतार
श्रीकृष्ण अवतार हा भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. पृथ्वीचा पालनकर्ता म्हणून भगवान विष्णूचे हे अवतार या भूतलावर झाले.
महाभारतातलं दृश्य...
महाभारतातलं हे एक अविस्मरणीय दृश्य आहे. कौरव-पांडवांच्या युद्धात निशस्त्र असून देखील श्रीकृष्णानं जे युद्ध जिंकलं. त्यातलंच हे एक दृश्य.
नर आणि नारायणाची भेट!
महाभारताच्या युद्धाद्वारं श्रीकृष्णानं संपूर्ण जगाला जे ज्ञान दिलं ते म्हणजे भगवंतानं सांगितलेली भगवद्गीता...तेव्ही नर आणि नारायणाची भेटही झाली.
द्रौपदी वस्त्रहरण...
जिनं बहिण मानलं त्या द्रौपदीचं रक्षण करण्यासाठी, श्रीकृष्णानं दाखवलेली एक लीला...
शिशूपालाचा वध...
शंभर चुका माफ केल्यानंतर श्रीकृष्णानं शिशूपालाचा वध केला. आपल्या सुदर्शन चक्रानं त्याचं शिर-धडापासून वेगळं केलं.
श्रीकृष्ण-सुदामा मैत्री
निस्वार्थ मैत्रीचं उदाहरण म्हणजे श्रीकृष्ण आणि सुदामाची मैत्री. आपल्या मित्राची सेवा करताना भगवान श्रीकृष्ण...
श्रीकृष्ण-रुख्मिनी विवाह
श्रीकृष्णा सोबतच्या लग्नाची आस लावून बसलेल्या रुख्मिनीला पळवून आणत केला विवाह...
कंस मामाचा वध...
ज्याच्या अत्याचारांमुळं अवघी धरती थरारली होती. त्या कंस मामाचा वध करताना श्रीकृष्ण...
राधे-कृष्ण... राधे-कृष्ण
ज्या प्रेमाचे दाखले प्रत्येक जण देतो. त्या राधा-कृष्णाचं एक प्रेमळ रुप...
कालियामर्दन...
आपल्या शक्तीचा अहंकार झालेल्या कालिया नागाचं मर्दन करणारं श्रीकृष्णाचं हे एक मनोहर रुप...
गो-वर्धन पर्वत...
इंद्राच्या प्रकोपापासून गोकूळ वासियांना वाचवण्यासाठी आणि पर्वत, वृक्षांचं महत्त्व पटवून देण्यासाठी लहान श्रीकृष्णानं आपल्या करंगळीवर गो-वर्धन उचलला...
श्रीकृष्णाचे विवाह...
स्त्रियांच्या मानाचं रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णानं १६ हजार महिलांसोबत विवाह केला.
/marathi/slideshow/कृष्णाची-विविध-रुपं_262.html/3