सेंट स्टीफन बेसिलिका, बुडापेस्ट, हंगेरी
इतर युरोपीय देशांच्या राजधानी प्रमाणेच हंगेरीची राजधानी बुडापेस्टमध्ये पण धार्मिक इमारतींची संख्या जास्त आहे. `सेंट स्टीफन चर्च` हे एक पर्यटकांचं आवडतं स्थळ आहे. या चर्चचं नाव हंगेरीच्या पहिल्या राजाच्या नावाने ठेवले आहे. हे चर्च हंगेरी मधील तिसरं मोठं चर्च आहे.
कॅमिनिटो, ब्यूनस आयर्स, अर्जेंटीना
कॅमिनिटो अर्जेंटीनाची राजधानी ब्यूनस अयर्सच्या जवळ असलेल्या बोसाजवळ आहे. हे एक स्ट्रीट म्युझियम आहे. इथे रंगित भिंतींच्या घरांमधील गल्लीत आर्टिस्ट त्यांचे चित्र विकतात. या जागेवर प्रेरीत होऊन जुआन डे डिओज फिलिबर्टोने १९२६साली प्रसिद्ध `कॅमिनिटो` म्युझिक तयार केलं होतं. म्हणून या जागेचं ऐतिहासिक महत्व आहे.
माइलकेलेंगेलो स्क्वेअर, फ्लोरेंस, इटली
इटलीच्या फ्लोरेंस शहरास स्थित ही जागा आपल्या निसर्गसौंदर्यासाठी जगभरातील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. या जागेला १८६९मध्ये आर्किटेक्ट गुईसेप्पे पोगी यानं डिजाइन केलं होतं. पर्यटकांशिवाय प्रोफेशनल छायाचित्रकार पण इथे भेट देतात.
हॉटेल डे पॅरीस, मोंटे कार्लो, मोनोक्को
`हॉटेल डे पॅरीस` मोनोक्कोच्या मोंटे कार्लो स्थित एक प्रसिद्ध हॉटेल आहे. हे हॉटेल १८६३ मध्ये चार्ल्स ३च्या शासनात सुरु करण्यात आले. हे हॉटेल मोनोक्कोच्या सुप्रसिद्ध हॉटेल पैकी एक आहे. या हॉटेलला जेम्स बाँडच्या `गोल्ड आय` चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
पोंट डेल अॅकॅडमिया, वेनिस, इटली
इटलीतील या शहरात एक तर बोटीनं फिरता येऊ शकतं किंवा चालत फिरता येतं. पोंट डेल अॅकॅडमिया ब्रिज हा इथलं प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. वेनिस ११७ द्विपांचा समूह आहे. हा समूह ४००हून जास्त पुलांनी जोडण्यात आलाय. हे शहर शिल्प, फॅशन, कला आणि संगीत यासाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय वेनिसमध्ये युरोपातील सर्वात मोठं कार पार्किंग आहे.
मॅडेन टॉवर, इस्तानबुल, तुर्की
मॅडेन टॉवरला लिएंडर टॉवर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे इस्तांबुलमध्ये समुद्रसपाटीपासून २०० मीटर लांब एका छोट्या द्विपवर वसलेलं आहे. या टॉवरच्या जवळ असलेली सुंदरता हेच याचं वैशिष्ट्य आहे. टॉवरच्या पहिल्या मजल्यावर एक रेस्टॉरंट आहे. तर टॉप फ्लोअरवर एक कॅफे आहे.
मौलिन रोग, पॅरीस
मौलिन रोग पॅरीसचा खूपचं प्रसिद्ध कॅब्रे आहे. इथं प्रत्येक संध्याकाळ ही रंगीत असते. कॅब्रे डांसर आपल्या अदाकारीचा जलवा दाखवत प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. सध्याच्या काळात तर मौलिन रोग खूपचं प्रसिद्ध होत चाललंय. इथं नृत्य आणि मनोरंजनचा पारा चढलेला असतो. हाच जलवा पर्यटकांना इथं खेचून आणतो.
पार्क गुएल, स्पेन, बार्सिलोना
बार्सिलोना जिल्ह्याच्या ग्रेसिया स्थित एका डोंगरावर एक पार्क निर्माण करण्यात आलंय. याच पार्कला `पार्क गुएल` म्हणतात. हे पार्क त्याच्या आर्किटेक्चरसाठी जगप्रसिद्ध आहे. इतकंच नाही तर या पार्कला वर्ल्ड हेरीटेज साइडवर पण जागा मिळाली आहे. या पार्कची निर्मिती कॅटलन एंटनी गौडी यांनी १९००साली केलीय. हे पार्क बनवण्यासाठी चार वर्ष लागली.
रोम, इटली ट्रिनिटा दे मोंती
कॅथलिक धर्माला प्रेरीत अनेक इमारती इथं पहायला मिळतील. हे शहर फोटोग्राफीसाठी खूपच प्रसिद्ध आहे. इथल्या इमारतींच्या बांधण्याची कलाही खूपच आकर्षक आहे. यातीलच एक इटली ट्रिनिटा दे मोंती आहे.
न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनचं `गुगेनहेम`
हे खूपच चर्चित असं एक म्यूझियम आहे. १९३९मध्ये सोलोमन आर, गुगेनहेम फाउंडेशननं याची स्थापना केली होती. या गोल इमारतीची डिझाईन फ्रॅंक लॉयड राइटनं केली होती. २०व्या शतकाच्या महत्वपूर्ण स्थापत्यांपैकी गुगेनहेम ही वास्तू आहे. महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे `स्टॅच्यू ऑफ लिबर्टी` पेक्षा जास्त प्रसिद्ध हे न्यूयॉर्कच्या मॅनहॅटन स्थित गुगेनहेम आहे.
/marathi/slideshow/जगातील-सर्वात-सुंदर-टॉप-१०-ठिकाणं_320.html/18