गुजरातमधील नवसारी खेड्यातून
जमशेदजी नौसेरवानजी टाटा यांनी अठराव्या शतकाच्या अखेरीस गुजरातच्या नवसारी नावाच्या एका छोट्याशा खेड्यात एक लहानसं रोपटं लावलं. आता या रोपट्याचा वटवृक्ष झालाय, त्याचं नाव टाटा उद्योग समूह. इतक्या वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द असलेला हा देशातला एकमेव उद्योग समूह असावा. या वाटचालीत अनेक दिग्गजांनी टाटा समूहाचं हे शिवधनुष्य लीलया पेललं. टाटा सन्स’चे अध्यक्ष रतन टाटा निवृत्त झाल्याने सायरस मिस्त्री हे पदभार स्वाकारत आहेत. मिस्त्री २००६ पासून टाटा सन्सच्या डायरेक्टरपदी कार्यरत आहेत. नोव्हेंर २०११ मध्ये त्यांची नियुक्ती उपाध्यक्ष (डेप्युटी चेअरमन) म्हणून करण्यात आली होती.
टाटा समुहाची मुहुर्तमेढ
टाटा समुहाची मुहुर्तमेढ जमशेद टाटा यांनी १८८७ मध्ये रोवली. जमशेदजींनी सुरुवातीला टाटा एण्ड सन्स नावानं एक फर्म स्थापन केली. टाटा सन्सचा कारभार चालवण्यासाठी जमशेदजीनी सर दोराब टाटा, सर रतन टाटा आणि आपला चुलत भाऊ आर.डी. टाटा यांची निवड केली.
सर दोराबजी
१८८७ पासून १९०४ पर्यंत जमशेदजीनी टाटा एण्ड सन्सच्या चेअरमनपदी काम पाहिलं. जमशेदजी हे चार बहिणींमध्ये एकमेव भाऊ होते. जमशेदजींनंतर ही जबाबदारी आली त्यांचा मोठा मुलगा सर दोराबजी टाटा यांच्याकडे. दोराबजी टाटा यांनी १९०४ ते १९३२ पर्यंत टाटा सन्सचे चेअरमन म्हणून त्यांनी काम पाहिलं.
सर नौरोजी सकटवाला
दोराबजी टाटा यांचा छोटा भाऊ रतन टाटा हे निपुत्रिक होते. रतन टाटा आणि त्यांच्या पत्नी नवजबाई यांनी नवल होरमुसजी टाटा यांना दत्तक घेतलं. सर दोराबजी टाटा यांच्यानंतर टाटा ग्रुपची जबाबदारी जमशेदजी टाटा यांचा भाचा सर नौरोजी सकलटवाला यांच्याजवळ आली. सर नौरोजी सकटवाला हे १९३२ ते १९३८ पर्यंत ग्रुपचे प्रमुख होते.
जेआरडी टाटा
१९३८ नंतर ही जबाबदारी जेआरडी टाटा यांच्याकडे आली. देशाचा स्वातंत्र्यकाळ, आर्थिक सुधारणांचा काळ याचे जेआरडी हे साक्षीदार होते.जेआरडी यांच्यानंतर ही जबाबदारी नवल टाटा यांचा मोठा मुलगा रतन टाटा यांच्यावर आली.
रतन टाटा
देशाचा स्वातंत्र्यकाळ, आर्थिक सुधारणांचा काळ याचे जेआरडी हे साक्षीदार होते. जेआरडी यांच्यानंतर ही जबाबदारी नवल टाटा यांचा मोठा मुलगा रतन टाटा यांच्यावर आली. रतन टाटा यांनी १९९१ ते २०१२ पर्यंत ग्रुपचे चेअरमन म्हणून काम पाहिलं. रतन टाटा यांनी आर्थिक उदारीकरणाच्या काळात वाढलेल्या विदेशी कंपन्याशी यशस्वी मुकाबला केला.
सायरस मिस्त्री
रतन टाटा यांनी १९९१ ते २०१२ पर्यंत ग्रुपचे चेअरमन म्हणून काम पाहिलं. रतन टाटा यांनी आर्थिक उदारीकरणाच्या काळात वाढलेल्या विदेशी कंपन्याशी यशस्वी मुकाबला केला. आता रतन टाटा यांचे चुलत भाऊ नोएल टाटा यांची पत्नी अलू मिस्त्री यांचा भाऊ सायरस मिस्त्री हे चेअरमनपदाची सूत्र सांभाळायला सज्ज झालेत.
‘टाटा सन्स’चे अध्यक्ष रतन टाटा निवृत्त झाल्याने सायरस मिस्त्री हे पदभार स्वाकारत आहेत. मिस्त्री २००६ पासून टाटा सन्सच्या डायरेक्टरपदी कार्यरत आहेत. नोव्हेंर २०११ मध्ये त्यांची नियुक्ती उपाध्यक्ष (डेप्युटी चेअरमन) म्हणून करण्यात आली होती.
/marathi/slideshow/टाटांचा-टाटा_182.html/3