धारावीत `पोंगल`ची लगबग
मुंबईतील धारावी भागात पोंगल सण साजरा केला जातोय. मूळच्या तामिळनाडूच्या महिला ऊस आणि हळदीच्या झाडाची या दिवशी पूजा करतात आणि पारंपरिक खाद्य पदार्थ बनवतात.
दक्षिण भारतात पोंगल तर, महाराष्ट्रात मकर संक्रांत
महाराष्ट्रात मकर सक्रांतीचा आज सण आहे, तर दक्षिण भारतात हा सण पोंगल म्हणून साजरा केला जातो.
पोंगलच्या जेवणाची तयारी
धारावीत पोंगलचा उत्साह ओसांडून वाहतोय. यावेळी तामिळ बंधू आपल्या पारंपरिक वेशभूषेत दिसून येतात.
हे दक्षिण भारतातलं नव्हे, धारावीतलं चित्र आहे.
सूर्याचं आजपासून उत्तरायण सुरू होतं आणि सूर्य दिवसेंदिवस उत्तरेच्या दिशेने कलतो. तामिळींसाठी हा सुगीच्या दिवसांचा शेवट आहे
श्रीलंकेत पोंगलच्या जेवणाची तयारी
भारताचा शेजारी देश श्रीलंकेतही पोंगल साजरा केला जातो, पोंगलच्या जेवणाची तयारी सुरू असतांना ...
गंगा-जमुना संगमावरील विलोभनीय दृश्य
उत्तर भारतात गंगा जमूना नदीच्या संगमावर दिवे लावून पूजा केली जाते. तेव्हा सर्व वातावरण भारावून जातं. काळोखात हे दृश्य अतिशय विलोभनीय दिसतं. हजारो हिंदू भाविक या दिवशी गंगेत डबकी घेऊन स्नान करतात. ही अंघोळ पवित्र मानली जाते. पुढील ४५ दिवस हे अभ्यंग स्नान सुरू असतं, याला माघ मेळा म्हणतात, तो आजपासून सुरू होतो.
चला चला माहिमच्या जत्रेला
मुंबईत सध्या माहिमची जत्रा सुरू आहे. ही जत्रा दहा दिवसांची असते, तेराव्या शतकातील सुफी संत मकदूम अली माहिमी यांच्या नावाने ही जत्रा भरते
/marathi/slideshow/धारावीत-पोंगल-सणाचा-उत्साह_300.html/2