बॉलिवूडची दिवाळी
दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. याच दिवशी १४ वर्षांचा वनवास भोगून राम, लक्ष्मण, सीता पुन्हा अयोध्येमध्ये परतले होते. यावेळी रामरायाच्या स्वागतासाठी संपूर्ण जनतेने दिव्यांची आरास मांडली. दारोदारी आकाशकंदिल लावले. अशी दिवाळी भारतीयांसाठी जिहाळ्याच सण आहे. या सणाचं महत्व आणि लोकांचा आनंद लक्षात घेऊन बॉलिवूडनेही आपल्या गाण्यांमध्ये दिवाळीचं वैशिष्ट्य नेहमीच अधोरेखीत केलं आहे. अशीच काही दिवाळीची गाणी.
हॅपी दिवाली
गीत- हॅपी दिवाली
चित्रपट- होम डिलिव्हरी (२००५)
एखाद्या ख्रिसमस साँगसारखी रचना असणारं पाश्चात्य सुरावटीचं अनोखं गाणं म्हणजे ‘हॅपी दिवाली.’ लहान मुलांवर चित्रित केलेलं दिवाळीवरचं हे गाणं सिनेमा फ्लॉप होऊनही बऱ्यापैकी लोकप्रिय झालं.
कभी खुशी कभी गम
गीत- कभी खुशी कभी गम
चित्रपट- कभी खुशी कभी गम
कभी खुशी कभी गम हे लता मंगेशकरांनी गायलेलं दिवाळी विशेष गाणं. या गाण्याला शास्त्रीय संगीताचा बाज आहे. जया बच्चन, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, राणी मुखर्जी यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं कभी खुशी कभी गम या सिनेमाचा आत्मा असल्याचं खुद्द दिग्दर्शकानेही मान्य केलं. भरजरी वस्त्रं, बडे कलाकार, श्रवणीय संगीत यामुळे हे गाणं लोकप्रिय झालं.
आयी हे दिवाली
गीत- आयी हे दिवाली
चित्रपट- आमदनी अठन्नी, खर्टा रुपय्या (२००१)
आयी है दिवाली हे कौटुंबिक स्वरुपाचं गाणं हे नवरा-बयकोच्या दिवाळीवर आधारित आहे. वेगवेगळेदिवे, फटाके यांच्याबरोबर जुही चावला, गोविंदा, तबूसारख्या कलाकारांनी हे गाणं स्क्रीनवर मजेदार केलं.
पैरों मं बंधन है
गीत- पैरों मं बंधन है
चित्रपट- मोहब्बते (२०००)
पैरों में बंधन है हे दिवाळीचा उत्सव मांडणारं गाणं संगीत आणि नृत्यामुळे गाजलं. सोबतीला ढोल वाजवल्यामुळे या गाण्याला नृत्याची जोड मिळाली. तीन नव्या तरूण कलाकारांच्या जोड्या या गाणयात दिसल्या होत्या. तरूणांना दिवाळी साजरी करण्यासाठी परफेक्ट गाणं.
शेहेर की परीयों
गीत- शेहेर की परीयों
चित्रपट- जो जीता वही सिकंदर (१९९२)
मुलींच्या मागे लागणाऱ्यामुलांच्या खोडकर स्वभावाला अनुसरून दिवाळीच्या मुहुर्तावरचं हे गाणं. जवळपासच्या मुलींकडे पाहाण्याऐवजी शहरातल्या मुलींचं आकर्षण हे या गाण्याचं वैशिष्ट्य
आयी है अब के साल दिवाली
गीत- आयी है अब के साल दिवाली
चित्रपट- हकीकत (१९६४)
आयी है अब के साल हे गाणं एक वेगळ्या प्रकारचं दिवाळीचं गाणं आहे. हे गाणं तरुणांचं, कुटुंबाचं एकत्र दवाळी साजरं करणं या विषयावर नसून सीमेवर देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाला दिवाळीत घराची आठवण आल्यावर त्याला वाटणाऱ्या दुःखाचा उद्गार या गाण्यात आहे.
लाखों तारे आसमाँ में
गीत- लाखों तारे आसमाँ में
चित्रपट- हरियाली और रास्ता (१९६२)
लाखों तारे आसमाँ में हे गाणं मुकेश आणि लता मंगेशकर यांनी गायलं आहे. मनोज कुमार आणि माला सिन्हा यांच्यावर हे गाणं चित्रित झालं आहे. मानवी दुःख या गाण्यातून व्यक्त केलं आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या गाण्यातील वेदना मनाला भिडते.
एक वोह भी दिवाली थी
गीत- एक वोह भी दिवाली थी
चित्रपट- नजराना (१९६१)
दिवाळीच्या दुसऱ्या बाजूचं वर्णन करणारं उदास वृत्तीचं दर्शन घडवणारं एक वो भी दिवाली थी हे आर्त गाणं. राज कपूरवर चित्रित झालेलं हे गाणं मुकेशने गायलं होतं.
कैसे दिवाली मनाए
गीत- कैसे दिवाली मनाए
चित्रपट- पैगाम(१९५९)
समाजातल्या वेगवेगळ्या घटकांची दिवाळी कशी असते याचं वर्णन करणारं हे विनोदी गाणं. विनोदी असलं तरी या गाण्यात सामाजिक भान आहे. जॉनी वॉकर या विनोदवीरावर हे गाणं चित्रित झालं आहे, तर महंमद रफींनी हे गाणं गायलं होतं.
/marathi/slideshow/बॉलिवूडची-दिवाळी_154.html/3