अभिषेक बच्चन आणि श्वेता बच्चन
बॉलिवूड अभिनेता अभिषेक आणि त्याची बहिण श्वेता बच्चन यांची जोडी सगळ्यांनाच आकर्षून घेते. अभिषेक अभिनय क्षेत्रात आहे. श्वेता मात्र या क्षेत्रात आली नाही. तिनं उद्योगपती निखिल नंदा यांच्याशी विवाह केला.
फरहान अख्तर आणि झोया अख्तर
`जिंदगी मिलेगी ना दोबारा` फिल्ममध्ये एकत्र काम केलेली भावा-बहिणीची ही जोडी. दोघंही उत्तम दिग्दर्शक आणि स्किन रायटर आहेत. दोघांनाही रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!
सलमान खान आणि अलविरा खान
नेहमी वादात अडकणाऱ्या दबंग सलमानची सगळ्यात जवळची असलेली म्हणजे त्याची बहिण अलविरा खान. आपलं कुटुंब सांभाळत अलविरा कायम सलमान सोबत असते.
सैफ आणि सोहा अली खान
रॉयल फॅमिलीतले हे भाऊ-बहिण... सैफनं बॉलिवूडमध्ये आपलं करियर जसं निभावलं तसं सोहाला काही निभावता आलं नाही. त्यांच्यातल्या नात्याविषयी नेहमीच बॉलिवूडमध्ये चर्चा होत असते.
हृतिक आणि सुनैना रोशन
हृतिकचा चित्रपट `क्रेझी-४`ची सहनिर्माती असलेली सुनैना रोशन हृतिकची मोठी आणि लाडकी बहिण आहे. आपल्या कँसरसारख्या दुर्धर आजारावर मात करत आपण रिअल लाईफमधला सुपर हिरो असल्याचं तिनं सिद्ध केलंय.
तुषार आणि एकता कपूर
आपल्या भावाच्या सदैव पाठिशी असलेली आणि त्याच्या करियरला नेहमीच उभारी देणारी बहिण म्हणजे एकता कपूर. तुषार सोबत तिनं अनेक सिनेमे केलेत आणि तुषारचं करियर सावरण्याचा ती नेहमीच प्रयत्न करते. अशी ही फिल्म इंडस्ट्रीतली भावाबहिणीची जोडी.
संजय आणि प्रिया दत्त
भाऊ `अभिनेता` आणि बहिण `राजनेता` अशी ही संजय दत्त आणि खासदार प्रिया दत्तची जोडी. मान्यता सोबत लग्न केल्यामुळं या भावाबहिणीत दूरावा निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. मात्र संजूबाबाला अटक होणं नक्की झालं. तेव्हा मुन्नाभाईला सांभाळायला बहिण प्रिया दत्तच पुढं होती.
/marathi/slideshow/बॉलिवूडचे-प्रसिद्ध-भाऊ-बहीण_258.html/3