नर्मदा अहुजा
बॉलीवूड स्टार किड्सची जेव्हा पण कधी गोष्ट येते, तेव्हा गोविंदाच्या मुलीचं नाव हे पहिला येते. सुंदर आणि टॅलेंटेड नर्मदाने आता पर्यंत 30 सिनेमे रिजेक्ट केले आहेत. यावरूनच कळतं की, नर्मदा सिनेमा करण्यासाठी किती उत्सुक आहे. नर्मदाला आपले वडिल गोविंदा प्रमाणेच कॉमेडी सिनेमा करण्यास उत्सूक आहे.
अतिया शेट्टी
येणाऱ्या काही दिवसातच अतिया शेट्टी सिनेमात दिसणार आहे. अतियाच्या पहिला सिनेमा `हीरो`ची शुटींग सुरू झाली आहे. येणाऱ्या दिवसात कळेल की आतियाची सिनेमात एन्ट्री आता तिच्या वडीलांसारखी दमदार होते, का मग ती इतर स्टार किड्स प्रमाणे फ्लॉप ठरते.
अक्षरा हसन
सारीका आणि कमल हासन यांची लहान मुलगी अक्षरा हसनला मोठ्या सिनेमाची ऑफर पाहिजे होती. ती तिची ईच्छ पूर्ण देखील झाली. अक्षरा हसन सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या सोबत आर. बाल्की यांच्या `एक अनाम` या सिनेमात काम करण्याचा चान्स मिळाला आहे. या सिनेमात दक्षिण भारतीय स्टार धनुष देखील काम करत आहे. या सिनेमाच शुटींग गोवामध्ये सुरू झालं आहे.
त्रिशला दत्त
त्रिशला दत्त ही संजय दत्तची मोठी मुलगी आहे. संजयच्या पहिल्या पत्नीची मुलगी असलेली त्रिशला सध्या न्यू यार्कमध्ये राहते. त्रिशला आपले फोटो सोशल मिडीयावर शेअर करतच असते. हे फोटो नेहमीच मिडीयामध्ये गाजत असतात. येणाऱ्या काळात वाइल्ड कार्ड एन्ट्रीने त्रिशला बॉलिवूडमध्ये येण्याची चर्चा चांगलीच रंगत आहे.
सारा
सारा :- सैफ अली खान आणि सैफची पहिली पत्नी अमृता सिंह यांची मुलगी सारा खान सिनेमात येण्याची बातमी येताच सैफच कुटुंब नेहमी या गोष्टीला अफवा आहे असं सांगून टाकतं. सध्यातरी सारा 20 वर्षाची असून अमेरीकेत अभ्यास करत आहे. ग्रॅज्यूएशन नंतर मात्र यशराज प्रोडक्शनसोबत काम करण्याची शक्यता जास्त आहे.
टाइगर श्रॉफ
जैकी श्रॉफचा मुलगा टाइगर श्रॉफ "हीरोपंती" हा येणाऱ्या काही दिवसातच "हीरोपंती" या सिनेमात झळकणार आहे. दमदार बॉडी असलेला टाइगर श्रॉफच्या सिनेमाच शुटींग अर्ध्यापर्यंत संपलेलं आहे. या सिनेमात टाइगरने 260 फुटावरून उडी मारून आपली फिटनेस दाखवली आहे.
सूरज पंचोली
आदित्य पंचोलीच्या मुलाचे नाव सिनेमात येण्याआधीच मिडीयात प्रचलीत झालं आहे. जिया खानच्या मृत्यू प्रकरणी आदित्यच नाव गाजत आहे. पण येणाऱ्या काळात आदित्य पंचोली `हीरो` सिनेमात दिसणार आहे.
करण देओल
सनी देओलचा मुलगा करण देओल बॉलिवूडमझ्ये येणं पक्क झालं आहे. दिग्दर्शक इम्तियाज अली करण देओलला आपल्या सिनेमात घेऊन त्याच बॉलिवूड लाँन्चिंग करणार आहे. करणने या आधी अनेक सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामं केल आहे.
सयामी खेर
जुन्या काळातील कलाकार ऊषा किरण यांची नात सियामी खेरने दक्षिण भारतीय सिनेमात काम केलेल आहे. पण अजून तीच बॉलिवूडमधील पदार्पण राहिलेल आहे. येणाऱ्या काळात सयामी दिग्दर्शक ओमप्रकाश मेहराच्या `मिर्जा साहेब` सिनेमात दिसणार आहे. ओमप्रकाशने खूप कलाकारांना रिजेक्ट केल्यानंतर सयामीला सिलेक्ट केल आहे.
/marathi/slideshow/बॉलिवूड-मध्ये-येणारे-नवे-चेहरे_324.html/3