स्वस्त चांगले स्मार्टफोन
महागड्या मोबाईलला स्पर्धा वाढल्याने सर्वसामान्यांना स्मार्टफोन घेणे शक्य झालेय. महागडे मोबाईलच्यापार्श्वभूमीवर अनेक परदेशी कंपन्यांनी भारतात मार्केटींग करत मोबाईल लाँच केलेत. स्वस्त मात्र, चांगले स्मार्टफोन हे महागड्या स्मार्टफोनला टक्कर दिली आहे. अशाच मोबाईलची माहिती घेवूया. कोणते आहेत हे साधे पण चांगले स्मार्टफोन
स्पाईसचा स्टेलर स्टेसी
स्पाईस कंपनीने आपला स्वस्त स्मार्टफोन बाजारात आणलाय. ‘स्पाईस स्टेलर स्टेसी एमआई-३५२’ हा फोन आपल्याला ऑनलाईन खरेदी करता येणार आहे. ३.५ इंच डिसप्ले आहे. यामध्ये एक ड्युएल सिम फोन आहे. यात अॅन्ड्रॉइड २.३ ऑपरेटिंग सिस्टमवर आधारीत काम करतो. ३ मेगा पिक्सेल असणाऱ्या या फोनची किंमत आहे ४,६३४ आहे.
विकिडलीकचा ‘वेमी टायटन’
अप्पलचा आयफोन सारखाच दिसणारा स्मार्टफोन विकिडलीकने तयार केलाय. हा फोन अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन धरतीवर असून ‘वेमी टायटन’ असे नाव आहे. अॅन्ड्रॉइड ४.१ जेली बीन ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. या फोनचा डिस्प्ले ५.५ इंट आहे. याची किंमत १३ हजार रूपये आहे.
नोकिया-११४
नोकियाने कमी किमतीत स्मार्टफोन आणलाय. नोकिया-११४ असे याचे नाव आहे. यामध्ये दोन सिम कार्डची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याची मेमरीही वाढवता येते. याची किंमत केवळ २.५४९ रूपये आहे.
‘फेबलेट’
भारतीय बाजारात नव्याने उतरलेल्या जोपो कंपनीने आपला ‘फेबलेट’ हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. स्वस्त मोबाईल मार्केटमध्ये आपला ‘फेबलेट’ हा फोन आणला असून याची किंमत १५,९९९ रूपये आहे.
‘स्मार्टी ए-३०’
मायक्रोमॅक्सने स्मार्ट सिरिजमध्ये नव्या फोनचा समावेश केला आहे. ‘स्मार्टी ए-३०’ असं या फोनचे नाव आहे. हा थ्रीजी फोन आहे.
लावाचा इरिस-५०१
लावा कंपनीने नवीन फोन बाजारात आणला आहे, याचे नाव आहे ‘स्मार्टी ए-३०’. या स्मार्टफोनचा स्क्रीन ५ इंच आहे. तो टचस्क्रीन फोन आहे.
आयडिया आयवरी
आयडिया कंपनीने आपल्या फोनमध्ये नव्याने आयवरी अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन आणला आहे. हा एक ड्युएल सिम फोन आहे. याची किंमत ७३९० रूपये आहे.
इंटेक्सचे दोन अॅन्ड्रॉइड फोन
इंटेक्स कंपनीने दोन नवीन अॅन्ड्रॉइड फोन बाजारात आणले आहेत. अॅक्वा ट्रेंडी आणि अॅक्वा फ्लॅश ही दोन मॉडेल इंटेक्सची आहेत. अॅक्वा ट्रेंडीची किंमत ४,९०० तर अॅक्वा फ्लॅशची किंमत ९,५०० आहे.
कार्बनचा ‘स्मार्ट ए-२’
कार्बन कंपनीने नवीन स्मार्टफोन बाजारात आणलाय. कार्बनचा ‘स्मार्ट ए-२’ हा स्मार्टफोन असून ४ इंच डिसप्ले स्क्रीन आहे. याची किंमत ४,७९९ रूपये आहे.
/marathi/slideshow/भारतातील-स्वस्त-स्मार्टफोन_184.html/18