स्टायलिश कार
देशातील तरुणांना डोळ्यासमोर ठेवून मारूती-सुझुकी कंपनीने नवी स्टिंगर कार बाजारात आणली आहे. ही कार स्पोर्टी कार आहे. या कारचे मार्केटमध्ये तीन नवीन मॉडेल असणार आहेत. या कारची किंमत ४ लाख १० हजार रूपयांपासून ४ लाख ६७ हजार या दरम्यान असणार आहे. स्टिंगरे वॅगन आर ही कार १ सीसी पेट्रोल इंजिनची आहे.. स्टिंगरे ही गाडी वॅगन आरच्या धर्तीवर आहे. या कारचे स्टायलिश पुढील लाईट आहेत. तर रियर वायपर स्पोर्टी लूक देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
पाच रंगात तीन मॉडेल
या स्पोर्टी कारचा लूकही जबरदस्त आहे. या कारचे मार्केटमध्ये तीन नवीन मॉडेल आहेत. या कारची किंमत लाखाच्या घरात आहे. ही कार पाच रंगात आहे. लाल, निळा, ग्रे आदी रंगात ही कार उपलब्ध आहे. या गाडीची किंमत 4,09,999 लाख रुपयांपासून ते 4,66,999 रूपयांदरम्यान आहे.
कारची किंमत
स्टिंग्ररे एलएक्सआय या मॉडेलची किंमत 4,09,999 रूपये असून व्हीएक्सआय मॉडेलची किंमत 4,37,999 रुपये आहे. तर व्हीएक्सआय एबीएस आणि ड्राइवर एयरबॅगचा पर्याय या कारमध्ये आहे. त्यामुळे या गाडीची किंमत 4,66,999 रुपये आहे.
कारचे अंतरंग
तीन सिलिंडरमधील कारचे इंजिन 998 सीसी आहे. याचे मायलेज लिटरला (पेट्रोल) 20.51 किलोमीटर आहे. तर के-10 इंजन 6200 आरपीएम वर 68 पीएस ची पॉवर क्षमता तसेच 3500 आरपीएम वर 90 एनएमचे टोर्क उपलब्ध आहे.
स्पोर्टी लूक
या कारची खासियत म्हणजे तरूणांना आकर्षित करणे ही आहे. त्यासाठी स्पोर्टी लूक देण्यात आला आहे. एक्सप्रेसिव्ह प्रोजेक्टर हॅडलॅप, स्टायलिश रिफलेक्टर ग्रील, गनमेटल ग्रे कलर, एलॉय व्हील, क्रोम प्लेटेड टेल लॅंप आणि बॅक डोरप्रमाणे कारचे अंतरंग आहे.
/marathi/slideshow/मारुती-सुझुकीची-नवी-स्टिंगरे-कार-कशी-आहे_277.html/3