जसपाल भट्टी
जसपाल भट्टींचा जन्म ३ मार्च १९५५ रोजी अमृतसरमध्ये झाला. ते राजपूत शीख होते. त्यांनी पंजाब इंजिनिअरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रिकल इंडिनिअरिंगची डिग्री मिळवली. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी नॉन-सेंस क्लब स्थापन करून आपल्या मित्रांसोबत पथनाट्य सादर करत असत.
व्यंगचित्रकार
कॉलेजच्या काळात सादर होत असलेल्या पथनाट्यांचं लिखाण आणि दिग्दर्शन खुद्द भट्टी करत आमि अभिनयही करत. या पथनाट्यांमध्येही त्यांच्या तीक्ष्ण सामाजिक जाणीवा ते लोकांप्रयंत पोहोचवत. या नाटकांचा विषय नेमही सामाजिकच असे. बहुतेक वेळा भ्रष्टाचारावर ही नाटकं असत. भट्टी काही काळ सुप्रसिद्ध ट्रिब्युन या वर्तमानपत्राच्या चंडिगढ आवृत्तीसाठी व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते.
टीव्हीवरील पहिला विनोदी कार्यक्रम`फ्लॉप शो`
१९९० भट्टी यांनी एक मोठं पाऊल उचललं. त्यांनी पहिला राजकीय व्यंगावर भाष्य करणारा विनोदी कार्यक्रम ‘फ्लॉप शो’ सरू केला. दूरदर्शनवर प्रसारित होत असलेला अशा प्रकारचा तो पहिलाच कार्यक्रम होता. हा कार्यक्रम तुफान लोकप्रिय झाला. आजही हा कार्यक्रम लोकांच्या स्मरणात आहे.
तुफान हिट `फ्लॉप शो`
दुरदर्शनवर केवळ सांस्कृतिक कार्यक्रम पेश होत असताना जसपाल भट्टींनी प्रथमच टीव्हीवर विनोद आणला. कमी बजेटमधला, आपल्या ग्रुपला घेऊन केलेला हा फ्लॉप शो १० भागांमध्ये प्रसारित झाला. यात स्वतः ते, त्यांची पत्नी सविता भट्टी, अभिनेता विवेक शौक इ. कलाकार काम करत होते.
`फ्लॉप शो`चे तीक्ष्ण विनोद
भाडेकरूंचं घरावर कब्जा करणं, ऑफिसमध्ये खोटी मेडिकल बिलं देऊन पैसे मिळवण्यासाठी केले जाणारे खटाटोप, टेलिफोनचं कनेक्शन मिळवण्यासाठी घ्यावा लागणारा त्रास, पीएचडीची डिग्री मिळवण्यासाठी आपल्या प्रोफेसरचं बनावं लागणारं ‘हरकाम्या’ असे सामाजिक विशेष कमालीच्या हुशारीने विनोदाची फोडणी देत सादर केले गेले. जसपाल भट्टी हे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. यानंतर ‘उल्टा पुल्टा’ या शो मुळे तर जसपाल भट्टींचं ‘उल्टा-पुल्टा मॅन’ हे नामकरणच केलं गेलं.
`उल्टा पुल्टा` आणि चित्रपट
६. मध्यमवर्गीय माणसांच्या दैनंदिन जीवनातल्या समस्या वात्रटिकांच्या अंगाने मांडल्या. यानंतर पंजाब पोलिसांच्या यंत्रणेला चिमटे काढणारा महौल ठीक है हा सिनेमा काढून सिनेमा क्षेत्रात पाऊल ठेवलं. हा सिनेमा यशस्वी झाला. बऱ्याच हिंदी सिनेमांमध्येही विनोदी भूमिकांमध्ये भट्टी दिसले. आ अब लौट चलेमधील इक्बाल सिंग, फना मध्ये जॉली गुड सिंग अशा अनेक भूमिका त्यांनी केल्या. जिजाजी नामक पंजाबी सिरीजही त्यांची गाजली होती. काही कॉमेडी शोमध्ये ते परीक्षक म्हणूनही दिसले होते.
जससपाल भट्टींचं समाज कार्य
अनेक सामाज कार्यांमध्येही त्यांनी भाग घेतला होता. अण्णा हजारेंच्या आंदोलनातही भट्टी यांचा सहभाग होता. महागाई, भ्रष्टाचार यासारख्या समस्यांवर भट्टी यांनी आवाज उठवला. स्त्रीभ्रूण हत्येवर आधारित भट्टी यांनी काढलेल्या ऍनिमेटेड चित्रपटाला २००९ साली पुरस्कारही मिळाला होता.
सिने निर्मिती आणि ट्रेनिंग स्कूल
‘मॅड आर्ट एंटरटेनेंट’ ही स्वतःची र्मिती संस्था स्थापन करून त्यातून जसपाल भट्टी विनोदी चित्रपट, कार्यक्रम, सिरीयल्स यांची निर्मिती, दिग्दर्शन करत. याशिवाय त्यांनी चंडिगढमध्ये ‘जोक फॅक्टरी’ नामक स्टुडिओ स्थापन केला होता आणि ‘मॅड आर्ट’ हे ट्रेनिंग स्कूलही स्थापन केलं होतं. आगामी ‘पॉवर कट’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना जालंधर येथे पहाटे कार अपघातात त्यांचं निधन झालं.
/marathi/slideshow/वात्रटिकां-चे-जनक-जसपाल-भट्टी_157.html/2