वाढदिवसाच्या शुभेच्छा
बॉलिवूडची शान शाहरूख खान...कित्येक नावाने ओळखली जाते ही व्यक्ती, बादशाह ऑफ बॉलिवूड, किंग ऑफ रोमान्स, किंग खान आणि एस. आर. के. आज शाहरूख त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करणार आहे.
शाहरूखला `झी २४ तास` कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...
कहाणी नवी दिल्लीतील
शाहरूखचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ मध्ये नवी दिल्लीतील एक मुस्लिम घराण्यातील पठाण वंशात झाला. शाहरूखचे वडील `ताज मोहम्मद खान` भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे कार्यकर्ता होते. शाहरूखची आई `लतीफ फातीमा`, यांना जनुंजा राजपूत घराण्यातील, मेजर जनरल शाह नवाज खान यांनी दत्तक घेतलं होतं. मेजर जनरल शाह नवाज खान हे इंडियन नॅशनल आर्मीमध्ये कार्यरत होते. एस.आर.के.च्या वडिलांनी भारत-पाकिस्तान फाळणीपूर्व पेशावर शहरातून नवी दिल्लीत स्थलांतर केलं होतं.
स्ट्रगल
शाहरूखनं इकोनोमिक्समध्ये ग्रॅज्यूएशन पूर्ण केलय. पण शाहरूखनं अचानक आपलं करियर चित्रपटांमध्ये करण्याचं ठरवलं होतं. नवी दिल्लीतील दिग्दर्शक बॅरी जॉन यांच्याकडे शाहरूखनं अभिनयाचे धडे घेण्यास सुरूवात केली. १९८८ मध्ये शाहरूखनची फौजी नावाची सिरीयल छोट्या पडद्यावर झळकली. त्यानंतर १९८९ मध्ये अझीझ मिर्झाच्या ‘सर्कस’मध्येही ‘एसआरके’ची भूमिका पाहण्याजोगी होती. १९८० मध्ये शाहरूखने नाटकं तसेच अनेक छोट्या पडद्यावरच्या सिरियल्स केल्यात.
पहिला ब्रेक
मुंबईत स्थलांतर केल्यानंतर शाहरूखला ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या ‘दिल आशना है’ हा चित्रपट मिळाला होता. पण काही कारणास्तव चित्रपट बॉक्स ऑफिसवर येण्यास उशीर झाला. १९९२मध्ये शाहरूखचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकला तो म्हणजे `दिवाना`. दिवानामध्ये ‘एसआर’के सोबत होते ऋषी कपूर आणि दिव्या भारती. शाहरूखचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाला.
खऱ्या अर्थाने झालेली सुरूवात
१९९३ मध्ये शाहरूखनं यशराज बॅनरचा ‘डर’ आणि अब्बास मस्तानचा ‘बाजीगर’हे दोन चित्रपट केले होते. दोन्ही चित्रपटांमध्ये शाहरूखने खलनायकाची भूमिका केली होती. तरीही सिनेचाहत्यांनी ह्या सिनेमांना भरभरून प्रतिसाद दिला होता. डरमधील शाहरूखचा ‘ककककक किरण’हा डायलॉग तसंच खुद्द शाहरूखही खूप प्रसिद्ध झाला. या दोन चित्रपटांमुळे शाहरूखच्या करियरची सुरूवात झाली होती. त्यांनतर अनेक हिट्स सिनेमे शाहरूखने दिले उदा – ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’, ‘करण-अर्जुन’,’कभी हा कभी ना’, ‘परदेस’, इत्यादी.
लग्न
करियर जितकं महत्त्वाचं होतं तितकंच प्रेमही. स्ट्रगल करत असताना शाहरूख एका पंजाबी कुडीच्या प्रेमात पडला होता. ही पंजाबी कुडी म्हणजे ‘गौरी खान’. दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते. गौरी एका श्रीमंत घराण्यात लाडात वाढली होती. शाहरूख स्ट्रगल करत असल्याने गौरीच्या घरातून त्यांच्या लग्नाला विरोध होता. पण शाहरूखनं आकाश ठेंगण वाटाव असं काहीस गौरीच्या पालकांनी करून दाखवलं आणि त्यांचा विरोध मोडून गौरीशी थाटामाटात विवाह केला.
२००३-१० मधील वेगळ्या विषयाचे चित्रपट
करण जोहरच्या ‘कल हो ना हो’ चित्रपटातील शाहरूखची भूमिका इतकी वेगळी होती की शाहरूखच्या अनेक चाहत्या पुन्हा एकदा त्याच्या प्रेमात घायाळ झाल्या होत्या. आपलाही जोडीदार चित्रपटात असलेल्या अमान माथूर प्रमाणं असावा असंच महिलावर्गाला वाटत होतं. त्यानंतर शाहरूख बऱ्याच वेळानंतर दिसला तो फराह खानच्या ‘मै हूं ना’मध्ये. त्यानंतर शाहरूख पहेली, वीर-जारा, रबने बना दी जोडी, ओम शांती ओम, माय नेम इज खान चित्रपटांमध्ये रोमँटीक रोल केला होता. `स्वदेस आणि चक दे इंडिया` हे चित्रपट शाहरूखच्या चाहत्यांनी एकदा दोनदा नाही तर अनेकवेळा सिनेमा गृहात जाऊन पाहिलेत.
प्रसिद्धी
बॉलिवूड दुनियेत शाहरूखचा कोणीही गॉडफादर नव्हता, शाहरूखनं जे काही मिळवलं आहे कमावलं आहे ते स्वतःच्या बळावर. म्हणूच शाहरूखला बॉलिवूड तसेच इतर क्षेत्रातही खूप नावाजलं जातं. शाहरूख तसेच शाहरूखचा बंगला ‘मन्नत’ पर्यटकांसाठी असलेलं आकर्षण आहे. शाहरूख फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूड,टॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे.
प्रोड्यूसर एस.आर.के
१९९९ मध्ये शाहरूखने अभिनेत्री जुही चावला आणि दिग्दर्शक अझीझ मिर्झा सोबत ‘ड्रिम्स अनलिमिटेड’ नावाची प्रोडक्शन कंपनीची स्थापना केली. २००४ मध्ये शाहरूख-गौरीने स्वतःची ‘रेड चिलीज एन्टरटेनमेंट’नावाची प्रोडक्शन कंपनी तयार केली. पहिल्या प्रोडक्शन कंपनी त्याने स्वतःचे तीन चित्रपट बनवले. रेड चिलीज मध्ये प्रोड्यूस केलेल्या चित्रपटांपैकी ‘मै हू ना’ आणि ‘चक दे इंडिया’ चित्रपटांनी बॉक्स ऑफिस खूप गाजवलं.
पत्नीचा पाठिंबा
गौरी आणि शाहरूखचं लग्न झालं तेव्हा गौरी सुखावह गोष्टी देण्यासारखं काही नव्हतं. गौरी-शाहरूख दिग्दर्शक अझीझ मिर्झांच्या घरात राहत होते. गौरी नेहमी शाहरूखच्या सुख-दुःखात अखंड त्याच्या पाठिशी उभी राहली. त्याच्या कार्यात नेहमी हातभार लावत राहिली. शाहरूख तसं मान्यही करतो की माझ्या यशाचं सारं श्रेय गौरीला जातं, कारण गौरी प्रत्येक वेळी माझ्यासोबत होती.
पुरस्कार
शाहरूखने आत्तापर्यंत ७० चित्रपटांत काम केलं आहे.
शाहरूखला त्याच्या पहिला चित्रपट दिवाना(१९९२) साठी ‘फिल्म फेअर सर्वोत्कृष्ट पदार्पण’ हा पहिला पुरस्कार मिळाला होता. बाजीगरसाठी फिल्म बेस्ट अक्टर पुरस्कार मिळाला होता. शाहरूखने आत्तापर्यत फिल्मफेअरचे १५ पुरस्कार पटकावले आहेत.
‘झी सिने बेस्ट अँकर’चे आठ पुरस्कार शाहरूखने जिंकले आहेत. २००५ मध्ये शाहरूखला ‘पद्मश्री पुरस्कार’नेही गौरवण्यात आलं आहे.
/marathi/slideshow/हॅप्पी-बर्थ-डे-किंग-खान_161.html/18