बॉलिवूडमधील रिप्लेसमेंट
बॉलिवूडमध्ये आता जमाना आला आहे तो, रिप्लेसमेंटचा. यामध्ये अभिनेता असो की अभिनेत्री. हिंदी चित्रपट सृष्टीत हा रिप्लेसमेंटचा प्रभाव दिसून येत आहे. जुन्या चित्रपटाची तुलना केली जाते आणि त्या चित्रपटात काम करणारे अभिनेते आणि अभिनेत्री यांचीही होते. त्यानुसार त्यांची तुलनाही केली जाते. मात्र, बऱ्याचवेळा एखाद्याचे खटकते आणि आधीच्या कलाकाराला डच्चू दिला जातो. त्याच्या जागी दुसरी व्यक्ती जागा घेते.
एक धक्कादायक बाब म्हणजे. १३ वर्षांपूर्वी ‘हम दिल दे चुके सनम’ (१९९९) रिलीज झालेला सिनेमा. या सिनेमासाठी माझे नाव चर्चेत होते, मलाच पहिली पसंती होती, असा गौप्यस्फोट करीना कपून हिने केला आहे. मुख्य भूमिकेसाठी ऐश्वर्या राय हिचे नाव नव्हते. मात्र, तिचा विचार केला गेला. आता तर अभिनेते चित्रपट निर्माता संजय लिला भन्सालीच्या सिनेमांना पसंती देत आहेत. त्यानंतर दुसऱ्याचा विचार करतात.
हिरोईन
या चित्रपटासाठी मधूर भंडारकरने ऐश्वर्या राय बच्चन हिच्या नावाला पसंती दिली होती. मात्र, ऐश्वर्याने प्रेग्नंट असल्याची माहिती दिल्यानंतर तिच्या नावाचा विचार केला गेला नाही. तिच्या ऐवजी प्रमुख भूमिकेसाठी करीना कपूरचा विचार केला गेला.
डॉन 2
या सिनेमासाठी २४१.४५ कोटी रूपये खर्च कऱण्याचे ठरले. यामध्ये शाहरुख खान, प्रियांका चोप्रा, लारा दत्ता, बोमन ईरानी आणि कुणाल कपूर हे दिग्गज् कलाकार होते. कुणालची भूमिकेसाठी अर्जुन रामपाल याला लॉन्च केले गेले. मात्र, या तारीख आणि वेळ न जमल्याने रामपाल हा सिनेमा करू शकला नाही.
कल हो ना हो
करण जौहरच्या या चित्रपटासाठी नैनाची भूमिकेसाठी खास मैत्रिण करीना कपूरला प्रमुख भूमिका देण्याचे ठरले होते. मात्र, तिच्या जागेवर प्रिती झिंटा हिला मेन रोल देण्यात आला. ‘कल हो ना हो’ या चित्रपटाला चांगले यश मिळाले तरी या दोन अभिनेत्रिंमध्ये कटूपणा आला. मात्र, समजोता केल्यानंतर त्यांच्यातील दुरावा दूर झाला.
मुन्नाभाई एमबीबीएस
विधु विनोद चोप्राने यांने सांगितले होते की, माझ्या चित्रपटात शाहरूख खान नेहमी काम करील. तोच सर्व सिनेमांसाठी माझी पहिली पसंती असेल. मुन्नाभाई ही चित्रपट शाहरूखसाठी होता. याची स्क्रीप्ट वाचल्यानंतर शाहरूखही राजी झाला. मात्र, शाहरूखला अपघात झाला आणि त्याच्या नावावर काट मारावी लागली. विधु विनोद चोप्राने संजय दत्तला प्राधान्य दिले. ही फिल्म हिट झाली.
कहो ना प्यार है
राकेश रोशनने करीना कपूरला बरोबर घेऊन चित्रपट करायची तयारी केली. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत करीना कपूर बरोबर हृतिक रोशनला संधी देण्यात आली. कारण हृतिकचा हा पहिला सिनेमा होता. कहो ना...चे शुटींग सुरू झाले. मात्र, मध्येच माशी शिंकली आणि करीना बाहेर पडला. त्यावेळी नवोदीत अभिनेत्री अमिषा पटेल हिला बरोबर घेवून राकेश रोशनने चित्रपट सुरू केला. हृतिकसाठी अमिषा लकी गर्ल ठरली.
हम दिल दे चुके सनम
करीना कपून ने दावा केला आहे की, संजय लिला भंन्साली यांच्या `हम दिल दे चुके सनम` साठी माझ्या नावाला पहिली पसंती होती. मात्र, ऐश्वर्या रायला पसंती दिली गेली. हा सिनेमा हिट झाला आणि ऐर्श्वयाच्या करिअरला एक वेगळे वळन मिळाले.
/marathi/slideshow/बॉलिवूडमधील-रिप्लेसमेंट_124.html