अमरावतीतील रोकड हा पक्षनिधी- ठाकरे

Last Updated: Monday, February 13, 2012, 14:46

अमरावतीत नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल एक कोटी रूपये हा पक्षनिधी असल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. उमेदवारांना हा पैसा देण्यात येणार असल्याचं माणिकरावांनी सांगितलय. काल अमरावती पोलिसांनी एका गाडीतून एक कोटींची रक्कम जप्त केली होती. फोर्ड गाडीतून हे पैसै आणण्यात आले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पैसा मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र हा पैसा पक्षनिधी असल्याचं माणिकरावांनी स्पष्ट केलं.

अमरावतीमध्ये एक कोटी रुपये जप्त

Last Updated: Sunday, February 12, 2012, 13:50

अमरावतीमध्ये पोलिस नाकाबंदीत फोर्ड एन्डेव्हर गाडीतून एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी या पैशांचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.