ऊसदर आंदोलनाला नक्षलवाद्यांचा पाठिंबा

Last Updated: Thursday, November 22, 2012, 18:05

शेतक-यांच्या ऊसदर आंदोलनाला आता नक्षलवाद्यांनीही पाठिंबा दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतक-यांवर झालेल्या अन्यायाचा नक्षलवाद्यांनी निषेध केला आहे.

ऊस आंदोलन पेटलं, राजू शेट्टी ताब्यात, बस जाळली

Last Updated: Monday, November 12, 2012, 10:55

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना इंदापूरमधून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोणीदेवकर इथं संतप्त शेतक-यांनी बस जाळलीये. दोन ते तीन बसच्या काचा फोडण्यात आल्यात. तर अनेक बस बंद पाडण्यात आल्यात.

ऊस दरावरून शेतकरी आक्रमक, `चक्काजाम` आंदोलनाचा इशारा

Last Updated: Sunday, November 11, 2012, 22:53

केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचे बंधू विशाल पाटील यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. उसाचा थकित हप्ता मिळावा आणि यंदा 3000 रुपये उचल देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत.

तोडगा निघाला तरी संभ्रम कायम

Last Updated: Friday, November 11, 2011, 15:14

शेतकरी संघटनांनी ऊस दरवाढीसाठी पुकारलेल्या आंदोलनावर तोडगा निघाला असला तरी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेने तो आपल्याला मान्य नसल्याचं म्हटलं आहे. सरकारने देऊ केलेला वाढीव दर एक रकमी देणार किंवा हप्त्या हप्त्याने देणार याबाबत संदिग्धता असल्याचं मत शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधीने व्यक्त केली आहे.

अखेर ऊस दराचा तिढा सुटला

Last Updated: Friday, November 11, 2011, 15:12

अखेर ऊसदराचा तिढा सुटला, कोल्हापूर विभागात 2050 रू. पुणे विभागासाठी 1850 तर उर्वरित महाराष्ट्रासाठी 1800 रू. दर निश्चित करण्यात आला आहे. लेखी पत्र मिळाल्यानंतर उपोषण सोडणार असल्याचं शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी सांगितलं आहे.

ऊसदराची चर्चा फिस्कटली

Last Updated: Thursday, November 10, 2011, 15:17

पुण्यात सुरु असलेली ऊसदराची चर्चा फिस्कटली. आज दिवसभर संध्याकाळ पर्यंत तोडगा निघेल असं चित्र निर्माण झालं होतं. सरकारवर कारखानदारांचा दबाव आहे आणि उद्या चर्चेतून तोडगा निघाला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करावा लागेल असा इशारा राजू शेट्टींनी राज्य सरकारला दिला आहे.