नवी मुंबईत मेट्रोचा एक बळी

Last Updated: Monday, September 17, 2012, 16:34

नवी मुंबईत खारघर येथे मेट्रो रेल्वेसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. गोविंद चव्हाण अस मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

पावसाचा दणका; एक बळी, वाहतूक विस्कळीत

Last Updated: Monday, June 18, 2012, 10:48

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. देवगडमध्ये पावसाच्या पाण्यात दहा वर्षाचा मुलगा वाहून गेलाय. तर मालवणमध्ये एका घरावर माड पडून एकजण जखमी झालाय. तर अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबई आणि ठाण्यातही पाऊस चांगला झाला. तर पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. कल्याण बदलापूर हा हायवे ४ तास ठप्प होता. कोकण रेल्वे उशिराने धावत आहे.