Last Updated: Sunday, December 9, 2012, 20:35
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपूरात सुरुवात होत असून या अधिवेशनापूर्वी विरोधकांनी सरकारच्या श्वेतपत्रिकेला उत्तर देण्यासाठी काळी पत्रिका प्रसिद्ध केली आहे. तसंच विरोधकांनी सरकारच्या चहापानावरही बहिष्कार टाकला आहे. सिंचन घोटाळा हा या अधिवेशनात केंद्रस्थानी राहणार असून या घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विरोधकांचे प्रमुख टार्गेट राहणार आहेत.