गांधींच्या चरख्याचा लंडनमध्ये कोट्यवधी रुपयांमध्ये लिलाव

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 15:59

महात्मा गांधीजींनी वापरलेल्या चरख्याची लंडनमध्ये झालेल्या एका लिलावात विक्री करण्यात आली आहे. हा चरखा एक लाख दहा हजार पौडांना म्हणजेच एक कोटी आठ लाख रुपये इतक्या किमतीत विकला गेला आहे.