नाशिककरांचे तोंडचे पाणी पळणार?

Last Updated: Monday, March 26, 2012, 20:50

आंतरराष्ट्रीय जलदिनीच नाशिककरांना पाणीकपातीचे संकेत मिळालेत. गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याहून कमी पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय. जलदिनी कपातीची घोषणा करणं पालिकेनं टाळलं असलं, तरी नाशिककरांना पाणीकपातीची टांगती तलवार दिसू लागली आहे.