Last Updated: Monday, March 26, 2012, 20:50
www.24taas.com, नाशिक आंतरराष्ट्रीय जलदिनीच नाशिककरांना पाणीकपातीचे संकेत मिळालेत. गेल्या वर्षीपेक्षा निम्म्याहून कमी पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचा इशारा महापालिकेनं दिलाय. जलदिनी कपातीची घोषणा करणं पालिकेनं टाळलं असलं, तरी नाशिककरांना पाणीकपातीची टांगती तलवार दिसू लागली आहे.
नाशिक शहराला पाणीपुरवठा कऱणा-या धरणांच्या पाणीपातळीत कमालीची घट झालीय. गंगापूर धरणात 1489 दशलक्ष घनफूट तर दारणा धरणात 2879 दशलक्ष घनफूट पाणीसाठी शिल्लक आहे. उन्हाळ्यातील वाढती मागणी आणि बाष्पीभवनाचा विचार करता 137 दशलक्ष घनफूट पाणी अधिक वापरलं जाण्याची शक्यता आहे.
पाणी जपून वापरण्याची ही राजकीय घोषणा झाली असली, तरी प्रशासन आणि पाटबंधारे विभागानं याबाबत मौन बाळगलंय. मात्र लवकरच याबाबत घोषणा होण्याची शक्यता असल्यामुळं नाशिककरांना आत्तापासूनच पाणी जपून वापरावं लागणार आहे.
व्हिडिओ पाहा...
First Published: Monday, March 26, 2012, 20:50