पंचगंगेत मैला, कोल्हापूर पालिका आयुक्तांनाच कारणे दाखवा नोटीस

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 21:47

पंचगंगा नदीत मैला सोडण्याचं काम कोल्हापूर प्रशासनाकडून सुरु आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावलीय. त्याचबरोबर महापालिका प्रशासन अनेकवेळा दिलेली आश्वासनं का पाळली नाहीत, याचा खुलासाही येत्या सात दिवसात करावा असे आदेशही या नोटीशीत देण्यात आलेत.

ऊस दराचा तिढा सुटणार!

Last Updated: Saturday, August 3, 2013, 16:59

राज्यात दरवर्षी निर्माण होणारा ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार ऊस नियंत्रण मंडळाची स्थापना केली जाणार आहे. ऊस, साखर, गाळप हंगाम, नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेण्याचे कामही हे मंडळ बघणार आहे. ऊस दरावरील तोडग्याबरोबरच शेतकरी संघटनेची ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्नही या निर्णयातून होणार आहे.