पेट्रोल दराबाबत ३०जूनच्या बैठकीत निर्णय

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 11:57

महागाईचा आगडोंब पेटलेला असताना सामान्यांना थोडासा दिलासा मिळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. १जुलैपासून पेट्रोलचे दर चार रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. ३० जूनला पेट्रोलच्या दराबाबत तेल कंपन्यांची आढावा बैठक होणार असून त्यानंतर हा निर्णय घेण्यात येणार आहे.

बातमी मस्त पेट्रोल स्वस्त

Last Updated: Wednesday, November 30, 2011, 15:05

आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत घट झाल्याने आज मध्यरात्री पासून पेट्रोलच्या किंमतीत प्रति लिटर ७८ पैशांनी कपात करण्यात आली आहे. तेल कंपन्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महिनाभरात दुसऱ्यांदा पेट्रोलच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ७०.६९ रुपये प्रतिलिटर मिळेल.

पेट्रोलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता

Last Updated: Monday, November 28, 2011, 16:47

एकीकडे महागाईचा भडका उडाला असताना पेट्रोलच्या किंमतीत कपात होण्याच्या शक्यतेने लोकांना थोडासा दिलासा मिळेल अशी आशा आहे. सरकारी तेल कंपन्या पेट्रोलच्या किंमतीत एक रुपया प्रति लिटर किंवा दीड टक्क्यांनी कपात करण्याची शक्यता आहे.