पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याचे वार

Last Updated: Wednesday, December 12, 2012, 18:34

पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणा-या युवतीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे. अनमोल जाधवराव या तरुणानं तरुणीवर कोयत्यानं हल्ला केला. जखमी युवतीला उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अनमोल जाधवरावला अटक केलीय.

'मेरा प्रेमपत्र पढकर...' म्हणत घ्या हृदयाची काळजी!

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:27

मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या काळात प्रेमपत्र लिहिणं म्हणजे जरा बोअरिंगच वाटणार! नाही? पण, जर तुमचं हृदय स्वस्थ ठेवायचं असेल तर हाच सल्ला तुम्हाला डॉक्टर देत आहेत. नुसता सल्लाच नव्हे तर यासाठी चक्क एका प्रेमपत्र लिहिण्याच्या स्पर्धेचं आयोजनही करण्यात आलंय.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 17:47

विद्यार्थिनींचा छळ करणाऱ्या प्राध्यापकावर कारवाई करावी या मागणीसाठी आज पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन केलं.