पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याचे वार attack on girl due to one sided love

पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याचे वार

पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याचे वार
www.24taas.com, पुणे

पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकणा-या युवतीवर एकतर्फी प्रेमातून हल्ला झाल्यानं पुण्यात खळबळ उडाली आहे. अनमोल जाधवराव या तरुणानं तरुणीवर कोयत्यानं हल्ला केला. जखमी युवतीला उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अनमोल जाधवरावला अटक केलीय.

हल्ला झालेली युवती आणि तिच्यावर हल्ला करणारा अनमोल हे दोघेही कोथरूड भागात शेजारी राहतात. अनमोलनं त्या मुलीला लग्नासाठी विचारलं होतं. मात्र तिनं नकार दिल्यानं चिडलेला अनमोल फर्ग्युसन कॉलेजच्या आवारात कोयता घेऊन फिरत होता. पीडित मुलगी कॉलेजच्या मागच्या गेटमधून मैत्रिणींबरोबर बाहेर पडत होती. त्याचवेळी अनमोलनं तिला अडवलं आणि पुन्हा लग्नाची मागणी केली. मुलीनं त्याहीवेळी नकार देताच अनमोलनं कोयत्यानं तिच्या खांद्यावर आणि पोटावर वार केला.

या हल्ल्यामध्ये ती गंभीर जखमी झाली. वार करुन अनमोल पळून गेला. मात्र नंतर पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून अटक केली. त्याला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

First Published: Wednesday, December 12, 2012, 18:34


comments powered by Disqus