मुख्याधापकांची ‘खिचडी’ शिजणार, बहिष्कार मागे

Last Updated: Thursday, August 22, 2013, 10:33

शालेय पोषण आहार योजनेवर टाकलेला बहिष्कार मुख्याधापकांच्या संघटनेनं मागे घेतला आहे. शिक्षण संचालकांसोबत औरंगाबादमध्ये मुख्याध्यापक संघटनेची बैठक झाली. या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आला.