ठाण्यात घृणास्पद राजकारणाने नागरिक संतप्त

Last Updated: Sunday, March 4, 2012, 16:05

ठाण्यात महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीत सत्तासंघर्ष भडकल्याने त्याची झळ सर्वसामान्य माणसाला बसली आहे. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे बेपत्ता झाल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने कालपासून ठाणे बंदची हाक दिली.

युतीचे ८० टक्के नगरसेवक संपर्कात- आव्हाड

Last Updated: Sunday, March 4, 2012, 14:16

राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे आणि त्यांच्या कुटुंबियांना आव्हांडांच्या इशाऱ्यानुसार त्यांच्या गुंडांनी अपहरण केल्याचा आरोप शिंदे यांनी केला होता.

सुहासिनी लोखंडेंना घातपात झाला असावा- एकनाथ शिंदे

Last Updated: Sunday, March 4, 2012, 14:40

बेपत्ता भाजप नगरसेविका सुहासिनी लोखंडे यांना घातपात झाल्याचा संशय ठाणे शिवसेना जिल्हा प्रमुख एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. सुहासिनी लोखंडेंना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या नेत्यांनी घातपात केल्याचं संशय एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी झी २४ तासशी बोलताना पोलिसांनी तपास जलदगतीने करावा अशी मागणी शिंदे यांनी केली

ठाण्यात मध्यरात्रीपासून तोडफोड, तणावपूर्ण स्थिती

Last Updated: Sunday, March 4, 2012, 07:48

महायुतीनं पुकारलेल्या ठाणे बंदला मध्यरात्रीपासूनच सुरुवात झालीय. शिवसैनिकांनी ठाण्यात 14 बसेस, 4 एसटी आणि 5 रिक्षांची तोडफोड केलीय. ठाणे स्टेशन परिसरात ही घटना घडलीय. शिवसैनिकांनी रात्रीपासूनच शहर बंद करायला सुरुवात केलीय.