राज्यात आजपासून तीन दिवस लोडशेडींग सुरु...

Last Updated: Friday, April 25, 2014, 10:36

राज्यात पुन्हा लोडशेडींगचे संकट उद्धभवणार आहे. आजपासून तीन दिवस हे भारनियमन असणार आहे. अकोला ते औरंगाबाद या उच्चदाब वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने शुक्रवार ते रविवारदरम्यान राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होणार आहे.

महाराष्ट्रात लोडशेडींग अटळ

Last Updated: Thursday, December 13, 2012, 21:23

महाराष्ट्र 2012 पर्यंत लोडशेडींग मुक्त होणार नाही यावर आता महावितरणनंही शिक्कामोर्तब केलंय. ज्या भागातील वित्तीय हानी मोठी आहे त्यांना लोडशेडींग न करता विज देणं महावितरणला परवडणारं नाही. त्यामुळे लोडशेडींग अटळ आहे. त्यामुळे राज्य लोड शेडींग मुक्त होणार हा राज्य सरकारचा दावा फोल ठरलाय

राज्यात अंधार, चार वीजनिर्मिती केंद्रात बिघाड

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 14:59

शंभर दिवसात महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त होणार अशी घोषणा करून काही दिवसच उलटत नाही, तोच महाराष्ट्र पुन्हा एकदा अंधारात गेला आहे.

धुळेकरांना वीजबिलाचे `धक्के`

Last Updated: Friday, August 17, 2012, 07:58

धुळेकर नागरिक महावितरणच्या वीज बिलांमुळे वैतागले आहेत. वाढत्या महागाईत महावितरणकडून येणारी अव्वाच्या सव्वा बिलांमुळे धुळेकर मेटाकुटीला आलेत. याबाबत स्थानिकांनी महावितरणाला जाब विचारला. मात्र बिलांमध्ये काहीच दोष नसल्याचं सांगत अधिकारी तक्रारदारांना आल्या पायानं माघारी पाठवत आहेत.

शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवरील इनव्हर्टर

Last Updated: Friday, January 6, 2012, 17:47

लोड शेडिंगच्या काळोखात शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारं इनव्हर्टर आता सौर ऊर्जेवर चार्ज करता येणार आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी या विषयी शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं आहे.

नाशिकच्या बागायतदारांवर महावितरणची 'वीज'

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 12:40

नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचं आणि बागेचं देखील पाणी पळालं आहे आणि त्याला महावितरणचे भारनियमन कारणीभूत ठरलं आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कृषिपंपांसाठी सध्या फक्त आठ तासच वीज पुरवठा होत आहे.

नाद करायचा नाय - अजितदादा

Last Updated: Sunday, October 16, 2011, 10:52

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी माझ्या नादाला लागू नये, असा सज्जड दम उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांनी सातारा येथील जाहीर सभेत भरला.