राज ठाकरे धोका आहे?

Last Updated: Sunday, March 17, 2013, 11:39

राज ठाकरे. राजकीय परखड आणि स्पष्ट वक्ता. युवकांचा आयकॉन. ज्यांच्या बोलण्यानंतर तसचं इशाऱ्यानंतर महाराष्ट्र नव्हे तर देश पुरता ढवळून निघतो. असं एक वादळी व्यक्तिमत्व. बरोबर सात वर्षांपूर्वी नऊ मार्चला महाराष्ट्राच्या राजकारणात ‘तुफान’ आलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापनी झाली. आज महाराष्ट्रात एक राजकीय नजर टाकली तर मनसे ‘राज’ दिसून येत आहे. या मागचं काय आहे गुपित? हे कसं काय शक्य झालं?, असे अनेक प्रश्न उभे राहतात.