मुंबईकरांना 'बेस्ट' शॉक

Last Updated: Friday, May 18, 2012, 13:26

मुंबईकरांसाठी एक वाईट बातमी. मुंबईकरांना 'बेस्ट' शॉक! बेस्ट बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांना महिनाभरापूर्वी बसलेला भाडेवाढीचा चटका अजूनही गरम असतानाच आता मुंबई शहराच्या कुलाबा ते माहीम-वांद्रे या पट्टय़ातील बेस्टच्या १० लाख वीज ग्राहकांनाही दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे हा मुंबईकरांना शॉक आहे.